राजस्थानात राकेश टिकैत यांच्या ताफ्यावर दगडफेक, शाईफेक; लोकशाहीवर हल्ला झाल्याचे राकेश टिकैत यांचे ट्विट

वृत्तसंस्था

अलवर :  दिल्ली बॉर्डरवरील शेतकरी आंदोलकांचे नेते, भारतीय किसान युनियनचे प्रमुख राकेश टिकैत यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर अज्ञात लोकांनी दगडफेक करून शाई फेकली.Rajasthan: Convoy of Bharatiya Kisan Union leader Rakesh Tikait’s was attacked at Tatarpur Chowk, Alwar, today

राजस्थानच्या अलवर शहरात ही घटना घडली. तातारपूर चौक, बानसूर रोडवर हा हल्ला केल्याचे ट्विट राकेश टिकैत यांनी केले आहे. त्यात गाडीच्या मागच्या काचा फुटल्याचा विडिओ देखील त्यांनी शेअर केला आहे.



अलवरच्या हरसौरा भागातील एका सभेला संबोधित केल्यानंतर राकेश टिकैत बानसूरकडे निघाले होते. त्याचवेळी तातारपूर भागात त्यांच्या गाडीवर काही अज्ञातांकडून दगडफेक केली. या दगडफेकीत गाडीच्या मागच्या काचा फुटल्या.

https://twitter.com/RakeshTikaitBKU/status/1377942417026940928?s=20

तसेच काही अज्ञातांनी राकेश टिकैत यांच्या अंगावर शाई फेकली. मात्र, राजस्थान पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवून राकेश टिकैत यांच्या गाड्यांच्या ताफ्याला चौकातून सुरक्षित बाहेर काढले आणि पोलीस सुरक्षेत टिकैत यांना बानसूरला पोहचवण्यात आले.

राजस्थान पोलीसांनी या प्रकरणात चौघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी चालू केली आहे. परंतु, राकेश टिकैत यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याची बातमी येताच त्याची प्रतिक्रिया दिल्ली – गाझीपूर बॉर्डरवर उमटली. टिकैत समर्थकांनी काही वेळ चक्काजाम केला. पण नंतर दिल्ली पोलीसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून रस्ते वाहतूकीसाठी खुले करून दिले.

Rajasthan: Convoy of Bharatiya Kisan Union leader Rakesh Tikait’s was attacked at Tatarpur Chowk, Alwar, today

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात