विजय थलपती-संगीता यांच्यात नेमकं काय घडलं? घटस्फोटाची केसच घेतली मागे

Thalapathy Vijay

विशेष प्रतिनिधी

सुपरस्टार थलपती विजय यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विजय आणि त्यांची पत्नी संगीता यांच्या वैवाहिक नात्याबाबत गेल्या काही काळापासून विविध चर्चा सुरू होत्या. संगीताने घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल केल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळाल्याचं वृत्त आहे. Thalapathy Vijay



मिळालेल्या माहितीनुसार, संगीताने दाखल केलेली घटस्फोटाची याचिका मागे घेतली आहे. त्यानंतर संबंधित न्यायालयाने हे प्रकरण बंद केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे विजय आणि संगीताच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना तूर्तास ब्रेक मिळाला आहे.

27 वर्षांच्या संसारानंतर मोठा ट्विस्ट

थलपती विजय आणि संगीता यांचा विवाह 1999 मध्ये झाला होता. दोघांना दोन अपत्ये आहेत. मुलगा जेसन संजय आणि मुलगी दिव्या अशी त्यांची नावे आहेत.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संगीताने घटस्फोटासाठी याचिका दाखल केल्याच्या वृत्तानंतर विजय यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. मात्र, सुमारे आठ महिन्यांनंतर याचिका मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्या कथित जवळिकीच्या चर्चांनीही यापूर्वी सोशल मीडियावर जोर धरला होता. दोघांचे काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर या चर्चांना आणखी उधाण आलं होतं. मात्र, या चर्चांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Thalapathy Vijay Sangeetha Divorce

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात