‘गुंगी गुडिया’ पोस्टवरून काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने; सुनेत्रा पवारांची माफी मागण्याची राष्ट्रवादीची मागणी

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून कथितरित्या करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या शब्दप्रयोगामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पोस्टचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जाऊन जोरदार निदर्शने केली.Sunetra Pawar

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कार्यालयात पोहोचले. त्यांनी काँग्रेसविरोधात घोषणाबाजी क रत संबंधित पोस्ट तातडीने हटवावी आणि सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.



या घडामोडीनंतरही हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या भूमिकेचे समर्थन करत, सुनेत्रा पवार यांनी टीकेला आपल्या कामातून उत्तर द्यावे, अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे दोन्ही पक्षांतील वाद आणखी तीव्र झाला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसच्या पोस्टचा तीव्र निषेध व्यक्त केला. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. काँग्रेसने सुनेत्रा पवार तसेच राज्यातील महिलांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

काँग्रेसच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून करण्यात आलेली ही पोस्ट पक्षाच्या वैचारिक दिवाळखोरीचे प्रतीक असल्याची टीकाही तटकरे यांनी केली. “शिव, शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात राजकीय मतभेद असू शकतात; मात्र महिलांचा अवमान करणारी आणि वैयक्तिक पातळीवर घसरलेली भाषा कदापि स्वीकारली जाऊ शकत नाही,” असे ते म्हणाले.

राजकारणात विचारांना विचारांनी आणि मुद्द्यांना मुद्द्यांनी उत्तर दिले पाहिजे. महिलांविषयी अवमानकारक भाषा वापरणे ही राजकीय संस्कृतीला शोभणारी बाब नसल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीही या प्रकरणाचा निषेध नोंदवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी वापरण्यात आलेली भाषा अपमानास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.

“ज्या काँग्रेसचे नेतृत्व सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासारख्या महिला नेत्या करतात, त्याच पक्षाकडून एका महिला नेत्याविषयी अशा प्रकारची भाषा वापरली जाणे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे,” असे पटेल म्हणाले.

काँग्रेसने संबंधित पोस्ट तातडीने मागे घेऊन जाहीर दिलगिरी व्यक्त करावी. महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिला.

Congress-NCP clash over ‘Gungi Gudiya’ remark against Sunetra Pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात