मुंबई : राज्यात ३० जुलैपासून लागू झालेल्या ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६’ विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची घोषणा केली आहे. हा कायदा नागरिकांच्या संविधानिक आणि मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असल्याचा आरोप त्यांनी केला. Prakash Ambedkar
मार्च महिन्यात झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मंजूर झाले होते. त्यानंतर राज्यपाल आणि राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर ३० जुलै रोजी राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाली आणि कायदा राज्यात लागू करण्यात आला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारतीय संविधानातील कलम २५ आणि २६ प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देते. व्यक्तीने कोणत्या देवाची किंवा संताची उपासना करावी, हा सरकारच्या नियंत्रणाचा विषय असू शकत नाही. या कायद्यामुळे जुन्या धार्मिक वादांना पुन्हा खतपाणी मिळू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी मुंबई उच्च न्यायालयात या कायद्याविरोधात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी E20 पेट्रोलच्या वापराबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली. ब्राझीलमध्ये E20 इंधन लागू करण्यापूर्वी वाहनांमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करण्यात आले होते. मात्र भारतात पुरेशी तांत्रिक तयारी नसताना हे इंधन वापरात आणल्याने वाहनांचे गॅस्केट खराब होणे, इंधन टाक्यांना गंज लागणे आणि इंजिन सीज होण्याचा धोका वाढल्याचा दावा त्यांनी केला. आवश्यक तांत्रिक सुधारणा होईपर्यंत E20 पेट्रोलचा वापर स्थगित करण्याची मागणीही त्यांनी केली.
दिल्लीतील NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवर फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाच्या आधारे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. आंदोलक विद्यार्थ्यांची माफी मागण्याऐवजी त्यांच्यावर नव्याने गुन्हे दाखल करण्यासाठी चेहरा ओळख तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याची टीका त्यांनी केली.
राजकीय घडामोडींवर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर यांनी २०२९ च्या संभाव्य राजकीय समीकरणांचा उल्लेख केला. २०१९ पासून वंचित बहुजन आघाडीला विरोधी पक्षांच्या ऐक्यापासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून काँग्रेसवर दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App