CJP : कॉकरोच जनता पार्टीच्या हेतूंना हरताळ; धर्मेंद्र प्रधानांचे जोरदार स्वागत, “व्हिलन” ठरायच्या ऐवजी झाले “हिरो”!!

Dharmendra Pradhan

नाशिक : NEET परीक्षेच्या पेपर फुटीच्या निमित्ताने मोठे आंदोलन करून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीने देशभर मोठा जल्लोष केला. त्यांनी अगदी विरोधकांची सुद्धा आपल्या मागे फरफट केली. धर्मेंद्र प्रधान यांना “व्हिलन” ठरवायचा त्यांचा बेत पूर्णपणे फसला. गेल्या दोन दिवसांच्या घडामोडीतून तसे दिसून आले.Dharmendra Pradhan

– पेपर फोडणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई

नीट परीक्षेच्या पेपर फुटीला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदार नव्हतेच. उलट त्यांनी आणि सरकारने पेपर फोडणाऱ्या विरोधात कठोर कारवाई केली होती. कॉकरोच जनता पार्टीने राजकीय हेतूंनी आंदोलन करून धर्मेंद्र प्रधान यांना “व्हिलन” ठरवायचा “डाव” खेळला. त्यामध्ये त्यांना विरोधी पक्षांनी स्वतःहून साथ दिली. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. मोदी सरकार मधल्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला म्हणून कॉकरोच जनता पार्टीने संपूर्ण देशभर जल्लोष केला. त्यामध्ये विरोधी पक्ष सुद्धा सामील झाले.



– धर्मेंद्र प्रधानांचे संसदेत स्वागत

पण धर्मेंद्र प्रधान यांना “व्हिलन” ठरवायचा “डाव” मात्र उधळला गेला. धर्मेंद्र प्रधान यांनी काल संसदेच्या परिसरात पाऊल टाकताच भाजपच्या आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. धर्मेंद्र प्रधान झिंदाबाद अशा घोषणा दिल्या. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी धर्मेंद्र प्रधानांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या चांगल्या कामगिरीचा गौरव करणाऱ्या पोस्ट लिहिल्या. धर्मेंद्र प्रधान यांनी इतिहासाच्या अभ्यासात बदल करून त्यामधून आक्रमक मुघलांचा इतिहासाचा गौरव करणारे पाठ हटवून त्यामध्ये मराठ्यांचा आणि अन्य भारतीय शासकांचा गौरवपूर्ण उल्लेख करणारे पाठ समाविष्ट केले, याबद्दल सुद्धा सोशल मीडियावर त्यांना प्रचंड पाठिंबा मिळाला. या सगळ्यातून या नेत्यांनी धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्री पदावरून राजीनामा द्यावा लागला असला, तरी भाजप त्यांना दूर सारणार नाही. त्यांचे राजकीय महत्त्व कमी करणार नाही, असाच संदेश दिला होता.

– “व्हिलन” ठरवायचा “डाव” उद्ध्वस्त

या राजकीय संदेशाचे पडसाद काल संसदेच्या परिसरात उमटले. त्याचबरोबर आज भुवनेश्वर विमानतळावर सुद्धा उमटले. धर्मेंद्र प्रधान यांनी आज विमानाने भुवनेश्वर गाठले त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोषात त्यांचे स्वागत केले. एरवी धर्मेंद्र प्रधान यांनी अनेकदा भुवनेश्वरचे दौरे केले किंवा ओरिसाचे दौरे केले, त्यावेळी त्यांचे क्वचितच असे स्वागत झाले असेल, एवढे मोठे स्वागत आज कार्यकर्त्यांनी त्यांचे केले. धर्मेंद्र प्रधान यांना “व्हिलन” ठरवायचा कॉकरोच जनता पार्टीचा इरादा त्यातून उद्ध्वस्त झाला. कॉकरोच जनता पार्टीला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यात यश आले, पण त्यांना “व्हिलन” ठरवून कायमचे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात अपयश आले. त्यामुळेच प्रियांका गांधी यांनी आज संसदेच्या परिसरात भाजप आणि धर्मेंद्र प्रधान यांच्याविरुद्ध आगपाखड केली.

CJP: The agenda of the ‘Cockroach Janata Party’ thwarted; Dharmendra Pradhan receives a rousing welcome—instead of becoming the ‘villain,’ he emerged as the ‘hero’!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात