नाशिक : विरोधकांमध्ये काँग्रेस एकाकी; चिदंबरम यांची लेखी कबुली!!, हीच राजकीय वास्तव पी. चिदंबरम यांनी केलेल्या दीर्घट्वीटमुळे समोर आले. पी. चिदंबरम यांनी 131 व्या घटनादुरुस्तीला विरोध करणारी ट्विट लिहिले. त्यामध्ये त्यांनी लोकसभा आणि विधानसभांच्या सीमांनकनाला विरोध केला. त्याचबरोबर त्यांनी विरोधी पक्षांमध्ये भाजपने फूट पाडल्याचे देखील लिहिले, पण त्यांनी सगळ्या विरोधकांमध्ये काँग्रेस एकाकी पडली किंबहुना काँग्रेसने स्वतःहून विरोधकांना दूर केले, हे राजकीय सत्य मात्र लिहिले नाही, पण हे ट्विट करून त्यांनी काँग्रेस एकाकी पडल्याची अप्रत्यक्ष कबुली मात्र देऊन टाकली.
– चिदंबरम यांचे ट्विट असे :
एप्रिल २०२६ मधील संसदेच्या अधिवेशनात अयशस्वी ठरलेले १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा आणण्याची भाजपची योजना आहे. या अयशस्वी विधेयकाचा उद्देश लोकसभेतील आणि राज्य विधानसभांमधील एक-तृतीयंश जागा महिलांसाठी राखीव ठेवणे हा असल्याचे भासविले गेले होते; परंतु त्याचा खरा उद्देश मतदारसंघांची पुनर्रचना (delimitaton) आणि कदाचित ‘जेरीमँडरिंग’ (मतदारसंघांच्या सीमांची राजकीय फायद्यासाठी फेररचना) करण्याचा मार्ग मोकळा करणे हा होता.
लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण देण्यासाठी ‘घटना (१०६ वी दुरुस्ती) कायदा’ याद्वारे भारतीय संविधानात यापूर्वीच दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, महिलांना आरक्षण देण्यासाठी नवीन विधेयकाची कोणतीही गरज नव्हती आणि आजही नाही.
टीएमसीमध्ये (TMC) फूट पाडल्यानंतर, आता त्या अयशस्वी विधेयकाच्या नवीन आवृत्तीला पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप एनसीपी-एसपी (NCP-SP) आणि डीएमके (DMK) यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असल्याची बातमी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), समाजवादी पार्टी आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षांना त्या अयशस्वी विधेयकाचा खरा उद्देश स्पष्टपणे समजला आहे आणि भविष्यातही ते आपली ठाम भूमिका कायम ठेवतील अशी अपेक्षा आहे.
ज्या विधेयकाचा खरा उद्देश मतदारसंघांची पुनर्रचना हा आहे, अशा अयशस्वी विधेयकाच्या नवीन आवृत्तीला दिलेला कोणताही पाठिंबा म्हणजे एप्रिल २०२६ मध्ये त्यांना योग्य दिशा दाखवणाऱ्या त्यांच्या स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीशी केलेला विश्वासघात ठरेल.
सध्याच्या सूत्रानुसार मतदारसंघांची पुनर्रचना केल्यास, ज्या राज्यांनी ‘राष्ट्रीय लोकसंख्या धोरणा’चे प्रामाणिकपणे पालन केले आणि आपल्या राज्यातील लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवले, त्यांच्या अधिकारांवर मोठा अन्याय होईल. आक्रमक भाजपपासून राज्यांच्या अधिकारांचे खंबीरपणे रक्षण केलेच पाहिजे.
The BJP is planning to bring back the 131st Constitution Amendment Bill that failed in the last session of Parliament in April 2026 The failed Bill purported to reserve for women one-third of the seats in the Lok Sabha and the State Assemblies but its real purpose was to pave… — P. Chidambaram (@PChidambaram_IN) July 14, 2026
The BJP is planning to bring back the 131st Constitution Amendment Bill that failed in the last session of Parliament in April 2026
The failed Bill purported to reserve for women one-third of the seats in the Lok Sabha and the State Assemblies but its real purpose was to pave…
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) July 14, 2026
– संशयाची पेरणी आणि काँग्रेस एकाकी
या ट्विटमध्ये चिदंबरम यांनी एम. के. स्टालिन आणि सुप्रिया सुळे यांना टॅग केले. पण चिदंबरम यांनी तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), द्रविड मुन्नेत्र कळघम आणि समाजवादी पार्टी यांची नावे लिहून त्या पक्षांच्या नेत्यांमध्ये एकाच वेळी संशयाची पेरणी केली आणि त्या पक्षांच्या नेत्यांना काँग्रेस पासून परस्पर दूर नेले. वास्तविक भाजपने मांडलेल्या विधेयकाला काँग्रेस बरोबरच चिदंबरम यांनी उल्लेख केलेल्या सगळ्या पक्षांनी एकमुखाने विरोध केला होता. त्यातली फक्त तृणमूळ काँग्रेस फुटली, पण शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम हे दोन पक्ष फुटले नाहीत. म्हणजे त्यांचे खासदार आज तरी फुटले नाहीत. तरीसुद्धा चिदंबरम यांनी या दोन पक्षांची नावे लिहिल्याने काँग्रेस आणि त्या दोन पक्षांमध्ये अंतर निर्माण झाले. त्यांच्यामुळे काँग्रेस विरोधकांमध्ये सुद्धा एकाकी पडली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App