नाशिक : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा “एक्सप्लेनेशन मोड” संपेना; करावा लागलाय वारंवार खुलासा!!, हे चित्र सलग दोन दिवसांमध्ये दिसले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची हीच अवस्था सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदाच्या निवडीला आव्हान मिळाले. त्यामुळे कायदेशीर तेच प्रसंग निर्माण झाला त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना “एक्सप्लेनेशन मोड” मध्ये यावे लागले. सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झालेली निवड अवैध असल्याचा दावा झारखंड राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सच्चिदानंद सिंह यांनी केला. त्यांनी तसे पत्रच पक्षाला पाठवले त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना वेगवेगळे खुलासे करावे लागले. सच्चिदानंद सिंह यांच्या पत्रामागे आपण नाही, असा खुलासा प्रफुल्ल पटेल यांना करावा लागला, तर सिंह यांच्या पत्राच्या कायदेशीर बाबी पडताळून त्यांना नोटीस पाठवू, असा खुलासा प्रफुल्ल पटेल यांना करावा लागला. पण पटेल आणि तटकरे यांच्या खुलाशानंतरही सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला मिळालेल्या आव्हानाचा मुद्दा अजून कायमच्या मिटू शकला नाही.
– जयंत पाटलांचे खुलासे
त्या पाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना वेगवेगळे खुलासे करावे लागले. जयंत पाटील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आले. त्यावेळी त्यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे राष्ट्रवादीचे तीन नेते राज्याचे अर्थमंत्री पद मागायला गेलेत, अशा बातम्या पसरल्या त्या राष्ट्रवादीच्या गोटातूनच समोर आल्या. कारण अमोल मिटकरी यांनी तसे ट्विट केले. पण जयंत पाटलांनी आज तसला कुठलाही प्रकार झाला नसल्याचा खुलासा केला. जयंत पाटलांच्या मतदारसंघातल्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावर ते मुख्यमंत्र्यांना फक्त पाच मिनिटे भेटले. मुख्यमंत्री वेगवेगळ्या बैठकांमध्ये बिझी होते. त्यामुळे मुख्यमंत्री फक्त पाच मिनिटे भेटू शकले. तटकरे आणि पटेल यांची जर आपली भेटच झाली नाही, असा दावा जयंत पाटलांनी केला. अर्थमंत्री पदाच्या बातम्या सुद्धा त्यांनी उडवून लावल्या.
– सुप्रिया सुळेंचे खुलासे
खासदार सुप्रिया सुळे यांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वेगवेगळे खुला असेल करावे लागले लोकसत्ता लोकसभा मतदारसंघांच्या परिसिमन बिलाला राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार त्याचबरोबर द्रविड मुन्नेत्र कळघम सुद्धा पाठिंबा देणार अशा बातम्या पसरल्या होत्या. त्यावर आमच्याकडे तसा कोणताही प्रस्तावच आलेला नाही. त्यामुळे आम्ही त्या बिलाला पाठिंबा द्यायचा प्रश्नच नाही, असा खुलासा सुप्रिया सुळे यांनी केला.
संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी द्रमूकच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि असदुद्दीन ओवेसी यांना बैठकीसाठी बोलाविले होते. त्यावेळी अमित शाह हे सुद्धा तिथे उपस्थित होते. त्यावेळी ५० टक्के जागा वाढीचा फॉर्म्युला असल्याचे त्यांनी सांगितले होते, पण प्रत्येकाची मते वेगवेगळी होती. आता आमच्या समोर बिलाचा मसुदा आला की 24 तासांच्या आत राष्ट्रवादी काँग्रेसचे भूमिका मांडू, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पण त्याच वेळी आमचे आयुष्य म्हणजे काय ब्रेकिंग न्यूज नव्हे, असे उत्तर त्यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर दिले. भाजपने कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही आम्ही आहोत, तिथे सुखी आहोत आमच्या आमदार खासदार किंवा पदाधिकाऱ्यांची की कोणीही विलीनीकरण संदर्भात केलेले वक्तव्य मी पाहिलेले नाही असा खुलासा सुप्रिया सुळे यांनी केला.
– “एक्सप्लेनेशन मोड”
पण राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस आतून किंवा बाहेरून मोदी सरकारला पाठिंबा देणार त्या बदल्यात सुप्रिया सुळे अन्य अन्य एखादा नेता मंत्रीपद पदरात काढून घेणार याविषयी संशय निर्माण होऊन बातम्या प्रसिद्ध झाले होत्या त्या बातम्यांचे सोर्सेस राष्ट्रवादी मधलेच होते. त्यामुळेच सुप्रिया सुळे यांना बऱ्याच गोष्टीवर खुलासा करावा लागला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक्सप्लेनेशन मूळ संपला नसल्याचे राजकीय वास्तव समोर आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App