विशेष प्रतिनिधी
मुंबई : Vinayak Raut माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर सून गिरीजा राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता राऊत विरुद्ध सून असा थेट वाद पेटला आहे. माजी खासदार विनायक राऊत यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत सुनेने 12 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे गिरीजा राऊत यांनीही सासरच्यांनी फसवणूक आणि छळ केल्याचा पुनरुच्चार केला आहे.Vinayak Raut
माजी खासदार विनायक राऊत यांनी सुनेचे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत म्हटले आहे की, गिरीजा राऊत गेल्या 3 वर्षांपासून पती गितेश राऊत यांच्यासोबत राहत नाहीत. जर 2018 ते 2022 दरम्यान घरात अघोरी कृत्य केले जात होते आणि त्यावेळी गिरीजाचे आई-वडीलही सोबत होते, तर त्यांनी तेव्हाच तक्रार का केली नाही? इतकी वर्षे गप्प राहून 2026 मध्ये अचानक तक्रार दाखल करण्यामागे नक्कीच काहीतरी षडयंत्र आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचे अघोरी उपाय केलेले नाहीत आणि या आरोपांचे आम्ही पूर्ण खंडन करतो, तसेच या प्रकरणी आम्ही न्यायालयात गेलो आहोत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.Vinayak Raut
12 कोटी आणि टेरेस फ्लॅटची मागणी
विनायक राऊत यांनी पैशांच्या मागणीवरून सुनेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, गिरीजा हिने आमच्याकडे तब्बल 12 कोटी 50 लाख रुपयांची मागणी केली होती. यामध्ये 5 कोटी रुपये रोख, मुंबईत 3 बीएचके टेरेस फ्लॅट, एक आलिशान कार आणि दर महिन्याला 2 लाख रुपये घरखर्च मिळावा, अशी तिची मागणी होती. आम्ही ही अवाजवी मागणी मान्य केली नाही, म्हणूनच केवळ आम्हाला बदनाम करण्यासाठी आणि दबाव आणण्यासाठी तिने आता हे खोटे आरोप करून प्रकरण बाहेर काढले आहे.
गितेश राऊत शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ- गिरीजा राऊत
विनायक राऊत यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना सून गिरीजा राऊत म्हणाल्या की, राऊत कुटुंबाने लग्नापूर्वी सर्व खोट्या गोष्टी सांगून आमची फसवणूक केली. लग्नानंतर संपूर्ण चित्र वेगळे होते आणि गेल्या 7 वर्षांपासून त्यांनी माझा प्रचंड छळ केला. राऊत कुटुंबाची मोठी राजकीय पार्श्वभूमी असल्याने आणि आज ना उद्या परिस्थिती सुधारेल, सुखाने संसार होईल या आशेने मी इतकी वर्षे सर्व काही सहन केले आणि कुठेही तक्रार केली नव्हती. मी त्यांच्याकडे कोणतीही संपत्ती किंवा पैसे मागितलेले नाहीत. त्यांनी माझा जो छळ केला, तो लपवण्यासाठीच ते आता खोटे बोलत आहेत. अघोरी कृत्य म्हणजे वेगवेगळ्या बाबांकडे मला नेत होते, कोणी जिंवत कोंबडे माझ्यावरून उतरवत होत तर कोणी कणकेच्या भावल्या करत डोक्यावरचे केस तोडून उतारे करत होते. उदी प्यायला देणं. मुलगा शारीरिक संबंध करण्यास अक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सर्व केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App