Vinayak Raut : विनायक राऊत यांच्यासह मुलावर सुनेकडून छळाचा आरोप; केस कापले, बळजबरीने गोमूत्र पाजले म्हणत सुनेची पोलिसात तक्रार

Vinayak Raut

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Vinayak Raut शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांचे कुटुंब एका मोठ्या वादात सापडले आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी पती, सासऱ्यांसह संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात गंभीर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे नगरसेवक पुत्र गितेश राऊत, सासू शामल राऊत यांच्यासह एकूण 7 जणांविरुद्ध कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Vinayak Raut

गिरीजा राऊत यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सासरच्या लोकांकडून त्यांचा प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. घरात त्यांच्यावर जादूटोणा करण्याचे प्रकार घडले. त्यांचे केस कापण्यात आले, तसेच त्यांना बळजबरीने गोमूत्र पिण्यास भाग पाडले गेले. सासू शामल राऊत या पती घरी असताना आणि नसताना अत्यंत वेगळ्या पद्धतीने वागायच्या. सतत टोमणे मारणे, माहेरच्या लोकांना घालून-पाडून बोलायच्या असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.Vinayak Raut



तक्रारीत काय काय?

विनायक राऊत यांच्या राजकीय दौऱ्यांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून, सासू शामल आणि पती गितेश हे गिरीजा यांना मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेण्यासाठी वारंवार दबाव टाकत असत. या औषधांमुळे दर महिन्याला मोठा त्रास सहन करावा लागल्याचे गिरीजा यांनी सांगितले. गिरीजा यांनी आपल्या वैवाहिक आयुष्यातील गंभीर समस्यांवरून पतीवर थेट आरोप केले आहेत. लग्नानंतर ऊटी येथे हनिमूनला गेले असता 6 दिवसांत गितेशने त्यांच्याशी कोणतेही शारीरिक संबंध ठेवले नाहीत आणि तो दूर पळत राहिला. विचारणा केली असता, शारीरिक संबंध महत्त्वाचे नसतात, मेंटल कनेक्ट असणे गरजेचे आहे आणि हनिमूनचा कंटाळा येतो, अशी उत्तरे त्याने दिली.

ते नेहमी दूर राहायचे

गिरीजा यांनी तक्ररीत म्हटलंय की, 2017-18 मध्ये जेव्हा ते मित्रासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले होते, तेव्हा मी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असता गितेशने मला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आणि उपाशी ठेवले. तू जर मला हात लावलास तर विधवा होशील, अशी धमकी त्याने दिली. शारीरिक संबंधांबाबत गितेशचे मत अत्यंत विचित्र होते. मी भारतात कम्फर्टेबल नाही, मी फक्त इंटरनॅशनल लोकेशन्सवरच संबंध ठेवू शकतो. मुंबईच्या घरात आईला ऐकू जाईल आणि मालवणच्या घरात मदतनीस रवी दादाला ऐकू जाई असे कारणे देऊन तो नेहमी दूर पळायचा, असे गिरीजा यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

Black Magic & Cruelty Row: FIR Against Shiv Sena UBT Leader Vinayak Raut & Family

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात