नाशिक : भारत डिजिटल झाल्याला ११ वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत भारताने प्रगतीची खूप उंच झेप घेतली. भारत जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याकडे वाटचाल सुरू असताना डिजिटल इंडियाने महत्त्वाची कामगिरी केली. भारतातल्या सामान्य नागरिकांच्या व्यवहारात क्रांतिकारी बदल झाले. त्यांचे व्यवहार सोपे झाले आणि अधिक सुरळीत झाले.
– आकडे बोलतात
‘डिजिटल इंडिया’च्या ११ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त ‘मीटी’ (MeitY) चे सचिव एस. कृष्णन यांनी माहिती दिली. त्यातली आकडेवारी थक्क करणारी निघाली. भारतात सुमारे १०० कोटी ब्रॉडबँड ग्राहक आहेत. दररोज ७५ कोटी यूपीआय (UPI) व्यवहार होतात; एकूण व्यवहारांच्या मूल्यापैकी जवळपास ९८% व्यवहार डिजिटल आहेत. आयएमएफने (IMF) यूपीआयला जगातील सर्वात मोठी ‘रिअल-टाइम पेमेंट्स सिस्टम’ म्हणून मान्यता दिली आहे.
S Krishnan, Secretary MeitY on memory chip shortage says: – Prices will have to work themselves out– Rollout of AI slows down a bit due to this– Device affordability is market-driven; govt is working on the supply side (File photo) pic.twitter.com/775m0rdbsT — ANI (@ANI) June 30, 2026
S Krishnan, Secretary MeitY on memory chip shortage says:
– Prices will have to work themselves out– Rollout of AI slows down a bit due to this– Device affordability is market-driven; govt is working on the supply side
(File photo) pic.twitter.com/775m0rdbsT
— ANI (@ANI) June 30, 2026
९ देशांनी लागू केली UPI प्रणाली
भारतानंतर जगातल्या ९ देशांनी यूपीआय प्रणाली लागू केली आहे; आणखी काही देश ती स्वीकारण्याची शक्यता आहे. देशभरात ३०० हून अधिक ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ (DBT) योजना राबवल्या जात आहेत. डीबीटी योजनांच्या माध्यमातून ५१.५ लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. २०१४ मध्ये, भारत ७५% पेक्षा जास्त स्मार्टफोनची आयात करत होता. – आता स्मार्टफोन ही निर्यातीतील सर्वात मोठी वस्तू बनली आहे. देशात उत्पादित होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या एकूण मूल्यापैकी ४८% वाटा देशांतर्गत उत्पादनाचा आहे. सेमीकंडक्टरचे १२ प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. ‘सीजी सेमी’च्या (CG Semi) सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन या आठवड्यात होणार आहे. भारतात आणखी प्रकल्पही येणार आहेत.
– नवी आव्हाने कोणती??
– एआय गुंतवणूक तैवान, कोरिया, अमेरिका यांसारख्या बाजारपेठांपुरती मर्यादित आहे. ती मर्यादा वाढून भारतातही गुंतवणूक करायला संधी आहे. एआयमधील केंद्रीकरणाच्या धोक्याची जाणीव आहे. विविध क्षेत्रांवर एआयचा प्रभाव पाडणारा देश बनण्याची भारताची इच्छा आहे. मेमरी चिपच्या तुटवडा असला तरी त्यांच्या किंमती टप्प्याटप्प्याने आपोआपच स्थिर होतील. यामुळे एआयचा विस्तार थोडा मंदावतो, पण एआयचा विस्तार झाल्याशिवाय राहणार नाही. उपकरणांची परवडण्याजोगी किंमत ही बाजारपेठेवर अवलंबून असते. सरकार पुरवठा सुरळीत करण्याच्या बाजूने काम करत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App