इराण – अमेरिका युद्धाचा भारतावर दुष्परिणाम; पण त्याचबरोबर नव्या क्षेत्रांमध्ये झेप घ्यायची संधी; नवनिर्माणाच्या क्षेत्रात “चांदी”!!

Iran-US war

नाशिक : कुठलेही युद्ध जसे मानवाला हानी पोहोचवते तसेच ते नवनिर्माणाच्या संधी सुद्धा निर्माण करते. असेच इराण विरुद्ध अमेरिका या युद्धात सुद्धा झाले. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धामुळे संपूर्ण जग इंधन टंचाईच्या विळख्यात लोटले गेले. भारतावर आर्थिक दुष्परिणाम झाला. भारतावर इंधन टंचाईचे वादळ घोंगावले. सर्वसामान्य भारतीयांना इंधन टंचाई बरोबरच महागाईला सामोरे जावे लागले. त्यातून रोजगाराच्या समस्या देखील उद्भवल्या. बचतीचे नवे मार्ग अवलंबायला लागले.Iran-US war would have adverse effects on India

पण त्याचवेळी भारतासारख्या देशासाठी नवनिर्माणाच्या संधी देखील उपलब्ध झाल्या. भारत आज अशा स्टेजवर आहे, की जिथे संकटाबरोबर संधी सुद्धा उपलब्ध झाल्या, तर त्या घेण्यासाठी लाखो नाही तर करोडो हात पुढे येतात. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धामुळे झालेल्या हानीतून नवनिर्माणासाठी अशा करोडो हातांना संधीचा लाभ पुढची अनेक वर्षे मिळणार आहे.



 

– नव्या संधी कोणत्या??

जागतिक भू – राजकीय आणि व्यापारविषयक घडामोडींमधील धोके आणि संधींबाबत बोलताना कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे (CII) अध्यक्ष आर. मुकुंदन म्हणाले, “स्पष्टपणे सांगायचे तर, काही नवीन क्षेत्रे नव्या संधी म्हणून समोर आली आहेत, तर अनेक पारंपरिक क्षेत्रेही आपले अस्तित्व टिकवून आहेत. उदाहरणार्थ, पश्चिम आशियातले युद्ध संपल्यानंतर संरक्षण क्षेत्र आणि पश्चिम आशियाची होणारी पुनर्बांधणी यांतून मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. शिवाय, आता “एरोस्पेस” (विमान आणि अंतराळ क्षेत्र) ही एक मोठी संधी म्हणून उदयास येत असल्याचे आपल्याला दिसत आहे. यावरून हे स्पष्ट होते की अनेक नवीन क्षेत्रे आता अग्रभागी येत आहेत. या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर सेवा, उत्पादन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर या क्षेत्रांमधील वाटचाल करत असताना, ‘मुक्त व्यापार करारां’बाबत (FTAs) बोलायचे झाल्यास, आपण आता केवळ करारांवर स्वाक्षरी करण्याच्या टप्प्यावरून पुढे जाऊन ‘मुक्त व्यापार करारांच्या प्रत्यक्ष वापराचा’ (Free Trade Utilisation – FTU) आढावा घेण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत.”

– socio economic political catalyst

याचाच अर्थ, भारत आता केवळ FTAs वर स्वाक्षऱ्या करून आपल्याला इतरांना देण्यापुरता उरलेला नसून FTU चा आढावा आणि लाभ घेण्यापर्यंत पुढे आलेला देश झाला आहे. याचाच अर्थ जागतिक पातळीवर नव्या भू – राजकीय व्यवस्था अस्तित्वात येताना भारताची socio economic political catalyst म्हणून भूमिका अत्यंत महत्त्वाची झाली आहे. भारताने नव्या क्षेत्रांमध्ये उतरून प्रत्यक्ष काम करायची संधी घेतल्यानंतर काही वर्षांमध्येच त्याचे रूपांतर लाभांमध्ये होईल. त्या लाभांचे रूपांतर संधीत आणि संधीचे रूपांतर अधिक लाभांमध्ये होऊ शकेल.

Iran-US war would have adverse effects on India; yet, it also presents an opportunity to make strides in new sectors—a golden opportunity in the field of reconstruction!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात