CM Eknath Shinde : 2022 ला चौकार मारला, आता थेट ‘सिक्सर’; हे ऑपरेशन टायगर फुलप्रूफ अन् सक्सेसफुल! एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी

CM Eknath Shinde

विशेष प्रतिनिधी

मुंबई : CM Eknath Shinde  “आम्ही कोणतेही ‘ऑपरेशन’ अर्धवट सोडत नाही, तर ते ‘फुलप्रूफ’ करतो. 2022 मध्ये आम्ही जेव्हा उठाव केला, तेव्हा चाळीस आमदारांचा चौकार मारला होता आणि आता थेट 6 खासदारांचा षटकार (सिक्सर) मारला आहे,” अशी तुफान फटकेबाजी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का दिला.CM Eknath Shinde

मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांनी अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘शिवसेनेत’ प्रवेश केला. या प्रवेशानंतर आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी आपले सविस्तर मनोगत व्यक्त केले.CM Eknath Shinde



उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे…

हा दुसरा टप्पा, थेट 6 टायगर्सचा षटकार!

खासदारांचे स्वागत करताना एकनाथ शिंदे म्हणाले, “22 जून 2022 रोजी आम्ही शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी उठाव केला होता. तो आमचा पहिला टप्पा होता आणि आता हा दुसरा टप्पा आहे. तेव्हा आम्ही 40 आमदारांचा चौकार मारला होता, आता 6 खासदारांचा षटकार (सिक्सर) मारला आहे. आज आमच्याकडे एक नव्हे, तर ‘6 टायगर’ उपस्थित आहेत.”

सर्व ‘6 वाघां’ची ओळख आणि कौतुक

एकनाथ शिंदेंनी उपस्थित सर्व खासदारांची त्यांच्या खास शैलीत ओळख करून दिली:

ओमराजे निंबाळकर (धाराशिव): “हे आपल्या मनाचे राजे आहेत. त्यांनी एकदा निश्चय केला की ते मागे हटत नाहीत.”

संजय दिना पाटील (मुंबई ईशान्य): “हा खरा दिनांचा (गरिबांचा) कैवारी आहे, अत्यंत बिंधास्त, बेधडक आणि दोस्तीसाठी उत्तम आहे.”

भाऊसाहेब वाघचौरे (शिर्डी): “यांच्या नावातच ‘वाघ’ आहे आणि भाऊ आहे. आमची लाडकी बहीण योजना आहे, तर भाऊ सोबत असायलाच हवेत.”

संजय जाधव (परभणी): “हे ग्रासरूटला काम करणारे कार्यकर्ते आहेत, जमिनीशी घट्ट नाळ जुळलेले नेते आहेत.”

संजय देशमुख (यवतमाळ): “हे उत्तमराव आहेत आणि त्यांना आपल्या मतदारसंघात अधिक उत्तम काम करायचे आहे.”

नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली): “हा आपला ओपनिंग बॅट्समन आहे. तो कुणाच्या अध्यात-मध्यात नसतो, पण त्याच्या वाटेला गेलात तर लक्षात ठेवा, त्याचे नाव ‘नागेश’ आहे.”

ट्रिपल संजयचा उल्लेख: “आज आमच्याकडे तीन-तीन संजय आहेत आणि तिकडे संजय राठोडही आहेत. त्यामुळे आता ट्रिपल संजय आल्यावर ‘बाकीच्या कोणत्या संजय’बद्दल (संजय राऊत) बोलायची आवश्यकता नाही.”

इथे कुणी मालक नाही, सगळे सहकारी आहोत

पक्षात आलेल्या खासदारांना आश्वस्त करताना एकनाथ शिंदे म्हणाले, “इथे कुणीही मालक नाहीये. आपण सर्वजण सहकारी आहोत. एकनाथ शिंदे कालही कार्यकर्ता होता आणि आजही कार्यकर्ता म्हणूनच तुमच्यासोबत वागेल. तुमचा आणि तुमच्या कार्यकर्त्यांचा मान-सन्मान राखला जाईल, कुठेही अनादर होणार नाही, हा माझा शब्द आहे.”

विकासासाठी ‘डबल इंजिन’ सरकारची ग्वाही

“हे सर्व खासदार कुठल्याही स्वार्थासाठी आलेले नाहीत. त्यांना आपल्या मतदारसंघातील जनतेला न्याय द्यायचा आहे, विकासकामे करायची आहेत. केंद्रात आणि राज्यात आपले ‘डबल इंजिन’चे सरकार आहे. त्यामुळे या खासदारांच्या मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प आणि कामे प्रामाणिकपणे सोडवण्याचे काम शिवसेना करेल,” असे आश्वासन शिंदेंनी दिले.

ओमराजेंना भावनिक साद

ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांच्या हत्येच्या निकालाचा संदर्भ देत शिंदे म्हणाले, “ओमराजे, दुर्दैवाने तुमच्या प्रकरणात अनपेक्षित निकाल लागला. पण मी तुम्हाला त्या दिवशीही सांगितले होते आणि आजही सांगतो, एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”

विरोधकांना सणसणीत टोला

“काही लोक (ठाकरे गट) म्हणतात आम्ही तुम्हाला तुडवू. आम्ही कुणालाही आडवे किंवा तुडवायला आलेलो नाही, तर आम्ही शिवसेना वाढवायला आलो आहोत. पण जर आमच्या कुणी आडवे आले, तर बाळासाहेबांनीच सांगितले आहे, ‘आला अंगावर तर घ्या शिंगावर’.”

तुमचे ‘ऑपरेशन टायगर’ फुलप्रूफ सक्सेस झाले!

शेवटी माध्यमांना उद्देशून शिंदे म्हणाले, “मीडियामध्ये गेले अनेक दिवस ‘ऑपरेशन टायगर.. ऑपरेशन टायगर’ चालू होते. आज मी अधिकृतपणे सांगतो की, आम्ही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही. हे ऑपरेशन पूर्णपणे फुलप्रूफ आणि सक्सेसफुल झाले आहे!”

या 6 खासदारांच्या प्रवेशामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे लोकसभेतील संख्याबळ आता 7 वरून थेट 13 वर पोहोचले आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा ठाकरे गटासाठी अत्यंत मोठा आणि निर्णायक धक्का मानला जात आहे.

Hit a Sixer After 2022 Boundary”: CM Eknath Shinde Celebrates Operation Tiger Success

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात