विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Dina Patil मला संजय राऊतांचा काही प्रॉब्लेम नाही, पूर्ण शिवसेना ठाकरे गटाची काही अडचण नाही. फक्त एका व्यक्तीसोबत प्रॉब्लेम आहे, असे ठाकरे गटाचे फुटीर खासदार संजय दिना पाटील यांनी म्हटले आहे. आता ही व्यक्ती कोण, त्यांचे नाव घेण्यास संजय पाटील यांनी टाळले आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाSanjay Dina Patil .
संजय दिना पाटील यांच्या मुलीच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, माझ्या घरात सर्वांना स्वतःचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्यांना काय करायचे आहे ते त्यांनी ठरवायचे आहे. कुठल्या राजकीय पक्षात काम करायचे आहे त्यांनी ठरवायचे आहे. माझा पुतण्या भाजपचा कार्यकर्ता आहे. माझी सूनबाई दुसऱ्यांदा भाजपची नगरसेवक आहे. एकाच घरात राहतो, एकाच किचनमध्ये जेवतो. मला काही प्रॉब्लेम नाही.Sanjay Dina Patil
त्यांना ताकदवर लोक नकोय, गुलाम लोक पाहिजे
तसेच काल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतली. त्यावर बोलताना संजय दिना पाटील म्हणाले, हेच जर अगोदर आले असते आणि यायची पण गरज नाही. मला आणि ज्या व्यक्तीसोबत प्रॉब्लेम होता, त्या व्यक्तीला बोलावले असते तर ही स्थितीच आली नसती. मी जर गेलो नसतो तर हा कोरमच पूर्ण झाला नसता. मला बोलवून घेतले असते, मी जे सांगत होतो, जिथे येऊन मला शिव्या दिल्या, तिथे येऊन माफी मागा. मी त्यांच्याबरोबर मातोश्रीला गेलो असतो. पण त्यांना आम्ही नकोय. त्यांना ताकदवर लोक नकोय, गुलाम लोक पाहिजे. पण मला उद्धव साहेबांसोबत, आदित्य ठाकरेंसोबत, त्यांच्या कुटुंबासोबत काहीच प्रॉब्लेम नाही. सर्वांनी मला मानसन्मान दिलेला आहे, माझ्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
स्टेजवर बसून शिव्या द्यायला लागले
पुढे बोलताना संजय दिना पाटील म्हणाले, मला जर कोणी एक रुपया दिला तर मी त्यांचे 100 करून देतो. एवढे केले आहे. एका व्यक्तीने फक्त केले आहे. तोंडावर गोड बोलायचं आणि माझ्या सगळ्या लोकांना शिव्या द्यायच्या. किती सहन करणार शिव्या? स्टेजवर बसून शिव्या द्यायला लागले. बोलून थकलो, सगळे नेते मंडळी देखील त्यांना सांगून थकले.
संजय राऊत साहेबांचे माझ्यावर उपकार
संजय राऊत यांच्यावर तुमचा रोख आहे का? असा प्रश्न विचारला असता संजय दिना पाटील म्हणाले, संजय राऊत साहेब नेहमी मला चांगले बोलले आहेत. मला मानसन्मान दिला. मला देखील त्यांचा खूप मानसन्मान आहे. मला आमदार करण्यात त्यांनी खूप मोठी भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांचे उपकार आहेत माझ्यावर. त्यानंतर 2009 मध्ये खासदार होण्यासाठी त्यांनी मला खूप मदत केली. ते मोठे व्यक्ती आहेत, ते बोलू शकतात. मला त्यांच्याबद्दल बोलायचे नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App