विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जलजीवन मिशन आणि देशात जाणवणाऱ्या पाणीटंचाईच्या अनुषंगाने केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीतील अंत्योदय भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स येथेमहत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या ५१ हजार जलजीवन मिशनच्या योजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. CM Devendra Fadnavis
– योजनांमध्ये तांत्रिक बदल
अनेक योजना पूर्णत्वाच्या मार्गावर असून काही योजनांमध्ये तांत्रिक बदल आवश्यक ठरले आहेत. काही भागांमध्ये पाण्याचे स्रोत कोरडे पडल्याने निर्माण झालेल्या अडचणींवर उपाययोजना कशा करता येतील, यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. या योजनांमधील त्रुटी दूर करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विविध पर्यायांवर विचारविनिमय करण्यात आला.
– नदी जोड प्रकल्पांवर विशेष भर
यावेळी नदीजोड प्रकल्पावर विशेष चर्चा करण्यात आली. हा प्रकल्प महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाडा आणि इतर दुष्काळग्रस्त भागांसाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पामुळे सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार असून दुष्काळमुक्त महाराष्ट्र होण्याच्या दिशेने टाकलेले ते एक महत्त्वाचे पाऊल ठरेल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
– जलतारा उपक्रमाचा विस्तार
यासोबतच ‘जलतारा’ उपक्रमाच्या विस्तारावरही या बैठकीत चर्चा झाली. श्री श्री रविशंकर यांच्या संस्थेसोबत या उपक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला असून त्याचे काम डॉ. पुरुषोत्तम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सुरू आहे. सध्या सुमारे ६५ हजार जलतारा संरचना उभारण्यात आल्या आहेत. मात्र भूजलपातळी वाढविण्यासाठी आणि पाणी अधिक प्रमाणात जमिनीत मुरावे यासाठी या उपक्रमाची व्याप्ती आणखी वाढविणे आवश्यक असल्याबाबत या बैठकीत एकमत झाले.
या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील यांच्यासह सबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App