Kalpanaraje Bhonsle : मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकणे धोक्याची घंटा, NCERTच्या निर्णयावर कल्पनाराजे भोसलेंचा संताप

Kalpanaraje Bhonsle

विशेष प्रतिनिधी

सातारा : Kalpanaraje Bhonsle राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) आठवीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वगळल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी केंद्र सरकारविरुद्ध तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. “मराठा साम्राज्याचा नकाशा वगळणे ही धोक्याची घंटा असून, हे असेच चालत राहिले तर भविष्यात शिवरायांच्या इतिहासावर पडदा पाडण्याचा प्रयत्न होईल,” अशी भीती राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.Kalpanaraje Bhonsle

इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्याच्या ‘NCERT’च्या निर्णयामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावर कल्पनाराजे भोसले यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. NCERTच्या निर्णयाविरोधात आज सातारा जिल्हाधिकार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चावेळी माध्यमांशी बोलताना कल्पनाराजे भोसले यांनी केंद्र सरकारला तीव्र शब्दांत इशारा दिला आहे.Kalpanaraje Bhonsle



नेमके काय म्हणाल्या कल्पना राजे भोसले?

या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया देताना राजमाता कल्पनाराजे भोसले म्हणाल्या, “पृथ्वीतलावर जोपर्यंत चंद्र, सूर्य आणि तारे आहेत, तोपर्यंत शिवराय प्रत्येकाच्या हृदयात आणि नसानसात असतील. इतिहासाच्या पुस्तकातून महाराष्ट्राचा नकाशा पुसला जातोय, मग फक्त आम्हीच महाराष्ट्रात आहोत का? तुम्ही सुद्धा या मातीचा हिस्सा आहात, मग तुमचा आवाज कुठे गेला?” अशा शब्दांत त्यांनी महाराष्ट्रातील जनतेलाही प्रश्न विचारले आहेत.

साताऱ्यात विराट मोर्चा; केंद्र सरकारला १५ दिवसांची मुदत

या अन्यायकारक निर्णयाविरोधात खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या भगिनी श्री. छ. वृषालीराजे भोसले यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. ‘नकाशा हटवला तरी सत्य हटणार नाही’ आणि ‘महाराष्ट्र झुकणार नाही’ अशा आशयाचे फलक हाती घेऊन शिवप्रेमी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राजघराण्याने या संदर्भात केंद्र सरकारला १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. जर विहित मुदतीत मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट केला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा वृषालीराजे भोसले यांनी दिला आहे.

इतिहास पुसण्याचा प्रयत्न?

मराठा साम्राज्याचा अटकेपार गेलेला झेंडा आणि हिंदवी स्वराज्याचा विस्तार जगाला माहिती असताना, शैक्षणिक पुस्तकातून हा नकाशा वगळण्यामागे नेमका कोणाचा हेतू आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. “नकाशा वगळून तुम्ही सत्य लपवू शकत नाही,” अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या आहेत.

Danger Signal”: Kalpanaraje Bhonsle Leads Satara Protest Against NCERT

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात