नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीची पुडी एका सोशल मीडिया अकाउंटने सोडली. पण त्यामधून संशय पेरणी दोघांपैकी कुणाविषयी झाली??, हा सवाल समोर आला.
उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री दोन वाजता वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतल्याची बातमी प्रबुद्ध भारत या सोशल मीडिया अकाउंट वरून दिली गेली. अन्य मराठी माध्यमांनी सुद्धा त्या बातम्या देऊन महाराष्ट्राचा राजकारणात खळबळ उडवून दिली. संजय राऊत आणि नवनाथ बन यांनी वेगवेगळी उत्तरे दिल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात संशय बळावला.
पण नर्मदा गोदावरी यात्रेच्या निमित्ताने नाशिक मध्ये आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कुठलीही भेट झाली नसल्याचा खुलासा केला. भेटीची अफवा पसरविणाऱ्या संबंधित सोशल मीडिया अकाउंटला नोटीस बजावायची भाषा देखील फडणवीस यांनी केली. प्रबुद्ध भारतच्या संपादकांनी फडणवीस यांचे आव्हान स्वीकारले. त्यांनी नोटीस बजावू द्या, मग पुढचे बघू, असे प्रबुद्ध भारतचे संपादक जितरत्न पटाईत यांनी ट्विट केले.
– संशयाची पेरणी कुणाबाबत??
पण देवेंद्र फडणवीस यांनी प्रबुद्ध भारतला नोटीस बजवायची भाषा केली असली तरी मूळात प्रबुद्ध भारतने फडणवीस – ठाकरे भेटीची बातमी दिली नेमकी संशय पेरणी कुणाविषयी केली होती??, हा सवाल उपस्थित झाला.
– तीन सवाल
कारण एकीकडे उद्धव ठाकरे त्यांच्या विधान परिषदेच्या आमदारकीसाठी सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर पाठिंबा दिला असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्याची गरज भासली म्हणून ते त्यांच्याकडे गेले का??, की महाविकास आघाडीकडून आमदारकी मिळवून नंतरची राजकीय बेगमी करण्यासाठी ठाकरेंनी फडणवीस यांची भेट घेतली का??, उद्धव ठाकरे मध्यरात्री जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असतील तर त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष विधान परिषदेच्या आमदारकीसाठी पाठिंबा देतील का??, हे तीन सवाल समोर आले.
– भेटीची गरज फडणवीसांना नाही, तर ठाकरेंनाच
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडे एवढे मोठे बहुमत आहे, की त्यांना उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची कुठलीच गरज नाही, पण उद्धव ठाकरेंना मात्र आपल्या स्वतःच्या आणि आपल्या मुलाच्या राजकीय बेगमी साठी देवेंद्र फडणवीस यांची फार मोठी गरज आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडी कडून विधान परिषदेची आमदारकी मिळवून त्याच्या पुढची राजकीय बेगमी करण्यासाठी उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले होते का??, असा सवाल कुणी विचारल्याचे समोर आले नाही. फक्त फडणवीस आणि ठाकरे यांची भेट झाली, याविषयी संशय पेरणी मात्र झाली. पण ती संशय पेरणी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेंनाच जास्त बाधक होती. पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करून तो विषय आपल्या अंगावर ओढवून घेतला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App