नाशिक : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यातले सत्य तर सिद्ध केले, तरी त्यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला Tipu Sultan, Harshvardhan Sapkal proved the truth of Modi’s statement!!
वास्तविक हर्षवर्धन सपकाळ नव्या राहुल काँग्रेसच्या नव्या राजकीय धोरणानुसार बोलले, म्हणून तर त्यांची जीभ छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना हिंदू द्वेषी टिपू सुलतानशी तुलना करायला धजावली. अन्यथा ते जर जुन्या काँग्रेसचे म्हणजे खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असते, तर त्यांनी बोलताना आपली जीभ भलतीकडे वळवली नसती. पण हर्षवर्धन सपकाळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्णन केलेल्या मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांनी हिंदू द्वेषाने ग्रासलेल्या टिपू सुलतानची तुलना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये प्रचंड संताप उसळला. त्याचे पडसाद पुणे, मुंबई, नागपूर सह देशात सुद्धा उमटले, तरीसुद्धा हर्षवर्धन सपकाळ आपल्या वक्तव्यापासून मागे हटले नाहीत. त्यांनी आपले विधान मागे घेतले नाही. उलट भाजपवर पलटवार करताना त्यांनी भगतसिंग कोश्यारी, सावरकर वगैरे नेत्यांनाच आकारण घेरले. कारण ते मूळातल्या धर्मनिरपेक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षच नाहीत. ते मोदी म्हणतात त्याप्रमाणे मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. म्हणून त्यांच्या समर्थनासाठी मालेगावच्या इस्लाम पार्टीचे नेते सुद्धा समोर आले. असदुद्दीन ओवैसी यांनी सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांचे समर्थन केले. ते समर्थन करताना ओवैसी यांनी टिपू सुलतानची तरफदारी केली. सावरकरांची निंदा केली.
– काँग्रेस – AIMIM – इस्लाम पार्टी
यात विशेष काही घडले नाही. कारण मूळात आता काँग्रेस आणि असदुद्दीन ओवैसी यांची AIMIM पार्टी किंवा मालेगावातली इस्लाम पार्टी यांच्यात कुठला राजकीय फरकच उरलेला नाही. ते एकाच राजकीय परिवारातले सदस्य पक्ष बनलेत, म्हणून आता त्यांचे राजकीय आणि सामाजिक आदर्श सुद्धा बदललेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर ही नावे त्यांच्यासाठी फक्त तोंडी लावण्यापुरती उरलीत. पण प्रत्यक्षात काँग्रेस आणि बाकीच्या धर्मनिरपेक्ष पक्षांचे नेते टिपू सुलतान सारख्या धर्मांध बादशहाचे सेवक बनलेत.
– मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस
त्यामुळे त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्रात कितीही संताप उसळला किंवा मराठा संघटनांनी हर्षवर्धन सपकाळांची जीभ कापून आणायला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले, तरी सपकाळ यांना त्याचा फरक पडणार नाही कारण त्यांचा आता राजकीय पिंडच खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष उरलेला नाही तो मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेसमध्ये कधीच धर्मांतरित झालाय म्हणून तर त्यांना टिपू सुलतान हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श वाटायला लागलाय.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App