उद्धव ठाकरेंचे ९ पैकी ६ खासदार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला; पण शरद पवारांचे आठही खासदार सत्तेपासून वंचित!!

tutari

नाशिक : हो नाही करता करता अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ९ खासदारांपैकी ६ खासदार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेलेच. पण त्याच वेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठहीच्या आठ खासदार सत्तेपासून वंचित राहून हात चोळत बसले.Only operation tiger, big No to operation “tutari”

ऑपरेशन टायगरच्या नावाखाली गेले कित्येक दिवस ठाकरेंचे खासदार फुटणार असल्याच्या बातम्यांनी सगळ्या माध्यमांमध्ये धुमाकूळ घातला होता. अखेर त्याची आज रात्री उशिरा स्वतः संजय राऊत यांनीच वेगळ्या पद्धतीने पुष्टी केली.



– संजय राऊतांचे ट्विट

अपना सपना मनी..मनी!

महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी…आज रात्री प्रत्येकी १५ कोटींचा एडवांस देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे! @Dev_Fadnavis, असे ट्विट संजय राऊत यांनी केले.

– रोहित पवारांनी खुपसले नाक

या सगळ्या प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही संबंध नसताना रोहित पवारांनी मध्येच नाक खुपसून आदळआपट करणारे ट्विट केले.

मध्यमवर्गीयांच्या असलेल्या नोकऱ्या जात आहेत, युवांना नोकऱ्या मिळत नाहीत, महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे, आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडलेला आहे, इकडे यंदा एल-निनो च्या परिणामाने पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातुर आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तर दुसरीकडे आमदार खासदारांचा घोडेबाजार जोरात आहे!

फुटणाऱ्यांना आणि फोडणाऱ्यांना सुद्धा लाजा वाटायला हव्यात! अशांना खरच जनतेनेच राजकीयदृष्ट्या फोडलेच पाहिजे!, अशा शब्दांमध्ये रोहित पवारांनी आदळआपट केली.

– उद्धव ठाकरेंनी केली खासदारांची “सोय”

या सगळ्याचा अर्थ एवढाच निघाला, की उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांची भाजपच्या वळचणीला जाण्याची “सोय” करून दिली. त्यांनी दोनच दिवसांपूर्वी मातोश्रीवर बैठक घेऊन खासदारांचे म्हणणे ऐकून घेतले. त्याचवेळी त्यांना वेगळी राजकीय कुणकुण लागलीच होती. पण संजय राऊत आणि सुषमा अंधारे वगळता उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी आदळआपट करणारी प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती.

पण त्याचवेळी रोहित पवारांनी मात्र कुठलाही संबंध नसताना आदळआपट करणारे ट्विट केले. याचा अर्थच ते स्वतः आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आठही खासदार भाजपच्या सत्तेपासून पुन्हा एकदा वंचित राहिले. अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेले तेव्हा रोहित पवार त्यांच्याबरोबर गेले नाहीत. त्यामुळे ते सत्तेपासून वंचित राहिले. गेल्या दोन वर्षांमध्ये भाजपने सुद्धा त्यांना काही विचारले नाही. त्यामुळे त्यांचा सत्तेचा विरह वाढला आणि आता सुद्धा भाजपने ऑपरेशन टायगरच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंच्या ६ खासदारांना सत्तेच्या वळचणीला घेतले. पण शरद पवारांच्या एकाही खासदाराला विचारले नाही. त्यामुळे सुद्धा रोहित पवार आणि त्यांचे साथीदार सत्तेपासून पुन्हा एकदा वंचित राहिले.

– तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार फुटले

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसचे 29 पैकी 20 खासदार फुटले. त्यांनी सुरुवातीला स्वतंत्र गट स्थापन केला आणि तो गट नॅशनलिस्ट सिटिजन्स पार्टी ऑफ इंडिया नावाच्या छोट्या पक्षात विलीन केला. या पक्षाने भाजपच्या केंद्रातल्या सरकारला आणि पश्चिम बंगाल मधल्या सरकारला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे लोकसभेतले भाजपचे बळ वाढले. पण त्याचवेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ७ खासदारांचे आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पक्षाच्या 16 खासदारांचे “राजकीय महत्त्व” किंबहुना “पॉलिटिकल न्यूसन्स व्हॅल्यू” घटले. पण एकनाथ शिंदे यांनी “ऑपरेशन टायगर” करून स्वतःच्या शिवसेनेचा गट एकूण १३ खासदारांनी मजबूत करून घेतला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे दिल्लीतले “राजकीय महत्त्व” वाढले नाही, तरी जसेच्या तसे टिकून तरी राहिले. पण हे सगळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मर्जीने झाले.

– शरद पवारांच्या खासदारांना कुणी विचारेना

या पार्श्वभूमीवर भाजपने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ खासदारांच्या “शक्तीला” साधे विचारले सुद्धा नाही किंवा त्यांच्या खासदारांना कुठली लालूच दाखवून फोडायचा प्रयत्न सुद्धा केला नाही. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठहीच्या आठ खासदारांना विरोधी बाकांवर हात चोळत बसावे लागले. याचाच राग आणि संताप वेगळ्या पद्धतीने रोहित पवारांच्या ट्विट मधून बाहेर आला.

Only operation tiger, big No to operation “tutari”

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात