Rohit Pawar : रोहित पवार म्हणाले- विमानात काय घडले 9 तारखेनंतर सांगणार; विलीनीकरणाबाबत कुटुंबात कोणतीही चर्चा झालेली नाही

Rohit Pawar

विशेष प्रतिनिधी

पुणे : Rohit Pawar उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्र सुन्न असतानाच, आता या अपघाताबाबत नवनवीन माहिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “विमानात नक्की काय घडलं? कशा प्रकारे ही दुर्घटना झाली? याबाबत आमच्याकडे काही माहिती आली असून, ९ फेब्रुवारीनंतर मी यावर स्पष्टपणे भाष्य करणार आहे,” असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत पवार कुटुंबात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असेही त्यांनी सांगितले.Rohit Pawar

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला येत असताना विमान अपघातात निधन झाले. या घटनेबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, “एखादी मोठी घटना घडल्यानंतर नेमकं सत्य काय आहे, हे लोकांसमोर येणं महत्त्वाचं असतं. आमच्याकडे काही प्राथमिक माहिती आली आहे, आम्ही आणखी माहिती मागवत आहोत. ९ तारखेनंतर सर्व काही स्पष्टपणे मांडले जाईल.” त्यांच्या या वक्तव्यामुळे अपघातामागे काही तांत्रिक कारणांव्यतिरिक्त इतर काही गोष्टी होत्या का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.Rohit Pawar



अजितदादांचे भव्य स्मारक उभारणार

अजित पवारांवर ज्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार झाले, तिथेच त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय पवार कुटुंबाने घेतला आहे. यासंदर्भात आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. पार्थ पवार आणि रोहित पवार यांनी प्रत्यक्ष स्मारकाच्या जागेबाबत चर्चा केली. अजितदादांचे ३५ ते ४० वर्षांचे राजकीय कार्य लोकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांच्या स्मृतींचे जतन व्हावे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे कुटुंबाने स्पष्ट केले.

विलीनीकरणाच्या चर्चांवर नाराजी

अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “गेल्या २८ जानेवारीपासून आजपर्यंत पवार कुटुंबात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. आम्हाला सुद्धा या दु:खद काळात राजकीय भूमिका घेणे भावनिकदृष्टीकोनातून अवघत जात आहे. ९ फेब्रुवारीनंतर आपल्याला यासंदर्भात स्पष्ट बोलता येईल,” असे रोहित पवार म्हणाले.

विलीनीकरणावर भाष्य करण्याइतका मोठा नाही

“शेवटी दादांची इच्छा काय होती? काय गोष्टी घडल्या? हे लोकांपर्यंत गेले पाहिजे. विलीनीकरण होईल किंवा नाही होणार, यावर भाष्य करण्याइतका मी मोठा नाही. फक्त राजकीयदृष्टीकोनातून आरोप-प्रत्यारोप किंवा चर्चा महाराष्ट्रात सुरू आहेत, त्यामुळे दुःख वाटते. अजितदादांच्या मनात काय होते? याबाबत कुणीही चर्चा करत नाही. ती चर्चा दुसरीकडे भरकटत चाललेली असून, त्याला मोठमोठ्या नेत्यांनी राजकीय स्वरुप दिलंय. हे पाहून कुटुंबातील व्यक्ती म्हणून दुःख वाटत आहे,” असेही रोहित पवार म्हणालेत.

निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यांना साद

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. पवार कुटुंबाला या दुःखद घटनेमुळे प्रचाराला जाता आले नाही. यावर रोहित पवारांनी भावनिक आवाहन केले. “अजितदादा ज्या विचारांना पुढे घेऊन जात होते, त्यांच्या विचारांचे कार्यकर्ते जिथे जिथे उभे आहेत, तिथे लोकांनी त्यांना सहकार्य करावे. हीच दादांना खरी आदरांजली असेल.” असे रोहित पवार म्हणाले.

पवार परिवारालाही या दु:खद घटनेमुळे आणि या घटनेमुळे प्रचाराला कुठेही जाता आले नाही. त्यामुळे लोकच त्याबाबत समजून घेतील असे वाटते. आमच्या कुटुंबामध्ये कायमच पवार साहेब हे केंद्रबिंदू राहिलेले आहेत. जेव्हा केव्हा परिवाराला अडचणी आल्या, त्यावेळी पवार साहेब कायमच कुटुंबासोबत भक्कमपणे उभे राहिले आहेत. अजितदादा देखील अडचणीच्या काळात कुटुंबाच्या पाठिशी उभे राहिलेले आहेत.

Will Reveal What Happened in Plane After Feb 9: Rohit Pawar on Ajit Pawar’s Death

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात