विशेष प्रतिनिधी
गंगापूर : Mohan Bhagwat काही देश आपल्या व्यापारावर टेरिफ लावून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, आम्ही कुणाच्याही दबावाखाली काम करणार नाही, तुम्ही कितीही टेरिफ लावा, आम्ही आत्मनिर्भरतेच्या रस्त्याने जाणार आहोत, ज्यामुळे आमच्या देशात रोजगार मिळेल. विदेशातील रोजगार टाळण्याची चिंता आम्ही करणार नाही, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली.Mohan Bhagwat
गंगापुरात आयोजित हिंदू संमेलनप्रसंगी ते बोलत होते. महंत भास्करगिरी महाराज, महंत रामगिरी महाराज, १००८ शांतीगिरी महाराज यांची उपस्थिती होती. मोहन भागवत म्हणाले, ‘वसुधैव कुटुंबकम् संकल्पनेप्रमाणे संपूर्ण पृथ्वीची काळजी करणारा आपला हिंदू धर्म आहे. सर्व जगाला आपले कुटुंब मानणारा आपला धर्म असून शक्ती संपन्न राष्ट्र उभे करणारा समाज आपल्याला घडवायचा आहे. त्यासाठी आपल्या समाजाची समृध्दी, वैभव निश्चित करून एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ याप्रमाणे प्रत्येकाने काम करावे.Mohan Bhagwat
वेगवेळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या संस्कृती जोपासणे आपण सर्व एक आहोत, आपल्यावर अनेक परकीय आक्रमणे झाली. परंतु आपण आपली ओळख कायम ठेवली. तेव्हा आपण सर्वस्व गमावल पण स्वभाव नाही. भारताला समर्थशाली बनवण्यासाठी शक्ती, बुध्दी व युक्तीची गरज आहे. सज्जनांच्या शक्तीलाला शिलाच पाठबळ असते, जगाला आवश्यक असलेली मूल्ये, दिशा देण्याची क्षमता भारताकडे आहे’’.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App