विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ambadas Danve शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे सुरक्षित घर शोधण्याच्या प्रयत्नात असल्याचे विधान शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे. तसेच सुरक्षित घर मिळत असेल तर त्यांनी त्या सुरक्षित घरात राहावे, असा सल्ला देखील म्हस्के यांनी दानवे यांना दिला आहे. इतकेच नव्हे तर अंबादास दानवे यांना आम्ही आमंत्रण देतो, ते देखील योग्यच विचार करत आहेत, असे सूचक वक्तव्य देखील म्हस्के यांनी केले आहे.Ambadas Danve
नरेश म्हस्के यांनी अंबादास दानवे यांना शिंदे गटात येण्याची थेट ऑफर दिली असली तरी दानवे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नरेश म्हस्के यांनी पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर देखील खोचक टीका केली आहे. विरोधक चुकीच्या पद्धतीने टीका करत आहेत. निवडणूक धोरणाला कॉंग्रेसने विरोध केला, त्यामुळे त्यांचे दुटप्पी धोरण दिसून आले. उद्धव ठाकरे यांनी यातून दिशा घ्यावी. कॉंग्रेसच्या नादी लागून आपला कडेलोट झाला आहे त्यावर शिक्कामोर्तब झाला असल्याचे म्हस्के म्हणाले.Ambadas Danve
आगामी स्थानी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या विषयी प्रतिक्रिया देताना नरेश म्हस्के म्हणाले, महायुतीच्या संदर्भातील निर्णय वरिष्ठ नेते घेत असतात. महाराष्ट्रात महायुती शंभर टक्के आहे. ही महायुती कायम राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. ज्या ज्या ठिकाणी जर एकमत झाले नाही, त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढू आणि पुन्हा एकत्र येऊ, असेही म्हस्के म्हणाले.
तसेच राज्याच्या सरकारमध्ये महायुतीची सत्ता कायम राहणार आहे. नंतर सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील महायुतीची सत्ता येणार असल्याचा विश्वास नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App