अजितदादांच्या विरोधातल्या सगळ्या केसेस पुन्हा खुलणार??; पार्थच्या जमीन घोटाळ्यात राजीनाम्यासाठी दिल्लीतून दबाव??

Ajit pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पार्थ अजित पवारांचा जमीन घोटाळा बाहेर आल्यानंतर तो दाबण्यासाठी तो व्यवहारच रद्द करायचा प्रयत्न झाला. त्यासाठी 42 कोटी रुपयांचा दंड ठोठवायचाही प्रयत्न झाला. या सगळ्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवरच विश्वासार्हतेचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे अजितदादांच्या विरोधातल्या सगळ्या केसेस पुन्हा खुलणार??; पार्थच्या जमीन घोटाळ्यात राजीनाम्यासाठी दिल्लीतून दबाव??, दोन सवाल समोर आले.Will all cases against Ajitdada be reopened??; Pressure from Delhi for Parth’s resignation in land scam??

अजित पवारांच्या सगळ्या केसेस सध्या दाबण्यात आल्या पण त्या पुन्हा खोलण्यासाठी अंजली दमानिया उद्या हायकोर्टात अर्ज दाखल करणार आहेत. सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँक घोटाळा यांची सुनावणी सध्या बंद आहे त्यापैकी काही फाईल्स सरकारने क्लोज केल्या आहेत. परंतु त्या पुन्हा उघडाव्या ही मागणी अंजली दमानिया उद्या हायकोर्टात करणार आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या जुन्या केसेस सुद्धा खुलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



– अंजनी दमानिया कोर्टात

देवेंद्र फडणवीस अजित पवारांचे मित्र असल्यामुळे यांनी अजित पवारांवरच्या केसेस दाबून ठेवल्या. त्यांच्यासारख्या नेत्याकडून ही अपेक्षा नव्हती. परंतु फडणवीस यांनी केस दाबल्यामुळे त्या तशाच दबून राहतील अशी शक्यता नाही कारण हायकोर्टात आम्ही त्या सगळ्या केसेसच्या संदर्भात दाद मागू आणि त्या पुन्हा खुल्या करू, असे अंजली दमानिया यांनी पत्रकारांना सांगितले.

– दिल्लीतूनच वाढल्या हालचाली

महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्यावर पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारवर उडलेले पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्याचे डाग पुसण्यासाठी अजित पवारांचा राजीनामा घ्यावा. पार्थ पवार यांच्या विरोधात एफआयआर दाखल करावी, यासाठी थेट दिल्लीतून हालचाली होत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या बातम्या वेगवेगळ्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.

Will all cases against Ajitdada be reopened??; Pressure from Delhi for Parth’s resignation in land scam??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात