विशेष प्रतिनिधी
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथे जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव, एरंडोल या तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना शासनातर्फे निकषात न अडकता जास्तीत जास्त मदत देण्यात येईल. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. Jalgaon district
यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील आणि आमदार अमोल जावळे उपस्थित होते.
पोलिसांकडून दोन लाखांची मदत
राज्यातील विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यातून शेतकर्यांचे झालेले प्रचंड नुकसान यातून, धुळे जिल्ह्यातील विविध पोलीस अधिकारी-कर्मचार्यांनी त्यांच्या वेतनातून थोडीथोडी रक्कम एकत्र करीत 2 लाख रुपयांचा निधी गोळा केला. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळ्याच्या दौर्यावर असताना त्यांचे स्वागत करताना धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ही गोळा केलेली 2 लाखांची रक्कम एका धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे येथे आमदार योगेश टिळेकर यांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी ₹7,80,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App