विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर: Devendra Fadnavis महाराष्ट्रातील 12 मराठा मुख्यमंत्र्यांपैकी फक्त देवेंद्र फडणवीसच टार्गेट का?’ हा तमाम महाराष्ट्राच्या मनातील प्रश्न. मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाल्यावर हा प्रश्न आणखी चर्चिला जात आहे. वैजापूर शहरात एका बॅनरवर नेमका हाच प्रश्न विचारण्यात आला आहे.Devendra Fadnavis
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापले असतानाच, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बॅनरमुळे खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर लावण्यात आले असून, ‘Devendra Fadnavis
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अलीकडेच मुंबई गाठून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. मनोज जरांगे यांनी मुंबईतील आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फारसे सक्रीय दिसले नाहीत, यावरही चर्चा झाली. त्यामुळे जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीसांना आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष्य करण्याचा राजकीय डाव असल्याचा आरोप केला जात होता. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले असून, महाराष्ट्रात 12 मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले, मग टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीसच का? असा सवाल विचारण्यात आला आहे.Devendra Fadnavis
वैजापूर शहरात लावण्यात आलेल्या या होर्डिंगवर 1960 पासून महाराष्ट्रात झालेल्या 12 मराठा मुख्यमंत्र्यांची नावे आणि त्यांचे फोटो आहेत. यात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंतच्या नेत्यांचा समावेश आहे. “गेल्या 64 वर्षांत 12 मराठा मुख्यमंत्री होऊनही, मराठा आरक्षणासाठी फक्त देवेंद्र फडणवीसच का टार्गेट केले जात आहेत?” असा सवाल या बॅनरवरून विचारण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, फडणवीस यांनी 2018 मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिले होते, मात्र 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने ते सर्वोच्च न्यायालयात घालवले, असेही बॅडिंगवर नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, वैजापूर शहरात लावण्यात आलेल्या या बॅनरमागे कोणाचा हात आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पोलिस प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत असून, हे बॅनर कुणी लावले याचा शोध घेत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App