Chhagan Bhujbal : मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही, भुजबळांचा पुनरुच्चार

Chhagan Bhujbal

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Chhagan Bhujbal  कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट करत मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचा पुनरुच्चार केला. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही. सुप्रीम कोर्टाने हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. हा समाज EWS मधून आरक्षण घेणार, कुणबीमधूनही घेणार, मग बाकीच्यांनी जायचे कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा समाजातील अभ्यासक व नेते या मुद्यावर बोलत नाहीत, असा टोलाही त्यांनी यावेळी मनोज जरांगे यांना हाणला.Chhagan Bhujbal

सगळे तुम्ही घेणार, मग बाकीच्यांनी जायचे कुठे?

छगन भुजबळ म्हणाले, ओबीसी – मराठा समाजातील संघर्ष शांत झाला पाहिजे असे मलाही वाटते. परंतु आज काही लोकांच्या (मनोज जरांगे) दादागिरीमुळे मराठा नेतेही बोलण्यास तयार नाहीत. त्यांचा दबाव त्यांच्यावर आहे. राज्यात मराठा नेते व मराठा मंत्री किती आहेत. शिक्षण क्षेत्रात अभ्यासक किती आहेत. लेखकही खूप आहेत. पण ते आज बोलू शकत नाहीत. कदाचित त्यांच्या मनातही याविषयी काहीतरी भीती असावी.Chhagan Bhujbal



मराठा समाज ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घेणार, मराठा आरक्षणातून घेणार, कुणबीमधूनही घेणार, मग बाकीच्यांनी कुठे जायचे? हा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही हे सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळेच त्यांनी मराठा समाजाला आरक्षण नाकारले. हा समाज इतरांपेक्षा फार पुढारलेला आहे हे कोर्टाने मान्य केले आहे. त्यामुळे काही अभ्यासू लोक असतील तर त्यांनी त्यावर विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले.Chhagan Bhujbal

तुम्हाला ओबीसी आरक्षण हवे तरी कशासाठी?

ते पुढे म्हणाले, माजी पंतप्रधान व्ही पी सिंह यांनी मंडल आयोग स्थापन केला तेव्हापासून आम्ही कोर्टाच्या पायऱ्या चढतो आहोत. आमची केस सुप्रीम कोर्टाच्या 9 सदस्यीय बेंच समोर गेली. तिथे त्याला व्यवस्थित चाळणी लावून ओके करून घेतले. कोर्टाच्या पायऱ्या या चढावाच लागतात. या लढाया सुरूच असतात. सध्या EWS या 10 टक्के आरक्षणात फक्त एकच समाज आहे. पंतप्रधान मोदी यांनी जे आरक्षण दिले, त्यातही 80 – 90% एकच समाज आहे. आम्ही ओबीसी, दलित आदिवासी यात बांधल्या गेल्यामुळे आम्हाला तिकडे जाता येत नव्हते. तुम्हाला ते नको आहे. तुम्हाला EWS दिले. त्यात 80 टक्के तुम्हीच आहात. त्यानंतरही तुम्हाला ओबीसी पाहिजे. कशासाठी?

कटऑफचे गणीतही समजावून सांगितले

छगन भुजबळांनी यावेळी कट ऑफचे गणीत मांडत कोणते आरक्षण फायद्याचे हे सांगण्याचाही प्रयत्न केला. मराठा आरक्षण ईडब्ल्यूएसमध्ये येते. वैद्यकीय क्षेत्र व इतर क्षेत्रात ओबीसींचा कटऑफ पॉईंट फार वर आहे. याउलट ईडल्ब्यूएसचा कटऑफ खाली आहे. मग हा फायदा आहे की नुकसान? तुम्हाला राजकीय आरक्षण हवे आहे की, शिक्षण व नोकऱ्यांसाठी हवे आहे हे ठरवा, असे ते म्हणाले.

दरम्यान, छगन भुजबळांनी यावेळी आपला मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास विरोध नसल्याचेही स्पष्ट् केले. आंदोलकांना नियमानुसार त्यातून मोकळे करण्यात येत असेल तर आमचा त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यास विरोध नाही. हा नियम शेतकरी, कष्टकरी, मोर्चेकरी, रास्ता रोको करणारे आंदोलक आदींनाही हाच नियम लागू झाला पाहिजे, असे ते म्हणाले.

Chhagan Bhujbal Reiterates Maratha Community Not Backward

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात