Rohini Khadse रोहिणी खडसे आणि शरद पवारांची भेट, खेवलकरांचा जामीन की आणखी काही?

विशेष प्रतिनिधी

पुणे: रोहिणी खडसे यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची भेट घेतली. सध्या पुणे रेव्ह पार्टी प्रकरणामुळे प्रांजल खेवलकर हे नाव चर्चेत असतानाच रोहिणी खडसे आणि शरद पवार यांची भेट ही देखील आता चर्चेचा विषय ठरत आहे. Rohini Khadse

रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर हे सध्या पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे शरद पवार आणि रोहिणी खडसे यांच्यात काय चर्चा होणार, याकडे सगळ्यांच लक्ष लागून होतं. या भेटीनंतर रोहिणी खडसेंनी माध्यमांशी चर्चा केली, दरम्यान आजची ही भेट केवळ पक्ष संघटनेच्या कामानिमित्ताने असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षात काही नियुक्त्या करण्यासंदर्भात शरद पवारांची भेट घेतली, असेही यावेळी रोहिणी खडसेंनी सांगितले.Rohini Khadse



27 जुलैला खराडी येथील एका उच्चभ्रू वस्तीतील स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये चालू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी 7 जणांना अटक केली. आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली. यात एकनाथ खडसेंचे जावई आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना देखील अटक झाली होती. खेवलकर यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. त्याच बरोबर ते इवेंट मॅनेजमेंट आणि रिअल इस्टेटचे व्यावसायिक आहेत.

प्रांजल खेवलकर हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. खडसे कुटुंबियांनी अद्यापही त्यांच्या जामिनासाठी अर्ज केला नाही. त्याबाबत विचारल्यावर हे न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे न्यायालयाबाहेर मी याच्याबद्दल काही बोलणं चुकीचं ठरेल, असं रोहिणी खडसे म्हणल्या. यावर आम्ही सगळे कुटुंबीय एकत्र चर्चा करून काय तो निर्णय घेऊ असं देखील त्या म्हणल्या. आम्हाला जी काही बाजू मांडायची असेल, ती आम्ही वकिलांमार्फत कोर्टात मांडू आणि मलाही जी काही बाजू मांडायची असेल, ती मी योग्य वेळी, योग्य ठिकाणी मांडेनच, असं रोहिणी खडसे म्हणाल्या.

Rohini Khadse and Sharad Pawar’s meeting, Khewalkar’s bail or something else?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात