वृत्तसंस्था
लखनऊ : Brij Bhushan Singh उत्तर भारतीय नेते आणि माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा घणाघात केला आहे. भाषा लोकांना जोडते, ती तोडत नाही. महाराष्ट्र आणि उत्तर भारतीय यांच्यातील नाते तुमच्या वागण्यामुळे तुटणार नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी राज ठाकरेंनी वाचले पाहिजे ते वाचत नाही असे वाटते असा टोलाही लगावला आहे.Brij Bhushan Singh
बृजभूषण सिंह ( Brij Bhushan Singh ) यांनी शिवाजी महाराजांचा दाखला देत सांगितले की, जेव्हा औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यात कैद केले, तेव्हा आमचे उत्तर भारतीय व्यापारी त्यांना मुक्त करण्यासाठी मदतीला धावून आले होते. आज ज्या इतिहासाचा अभिमान तुम्ही बाळगता, त्या इतिहासात उत्तर भारतीयांचेही योगदान आहे. Brij Bhushan Singh
राज ठाकरेंविषयी उत्तर भारतीयांमध्ये खूप राग
बृजभूषण सिंह म्हणाले की, राज ठाकरे यांनी जेव्हा अयोध्येत येण्याचा कार्यक्रम निश्चित केला, तेव्हा मी त्यांना अयोध्येत येऊ न देण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी आपला दौरा रद्द केला. परंतु आता पुन्हा आपले रंग दाखवत आहेत. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे उत्तर भारतीयांमध्ये खूप राग आहे. यामुळे उत्तर भारतीयांमधील एखाद्या मोठ्या व्यक्तीने राज ठाकरे यांना आव्हान दिले तर ते पेलू शकणार नाही. त्यामुळे माझा राज ठाकरे यांना सल्ला आहे.
..ते राज ठाकरेंना पेलणार नाही
बृजभूषण सिंह म्हणाले की, उत्तर भारतीय लोकांनी राज ठाकरे यांना भेटण्याचे आव्हान दिले तर तुम्हाला ते पेलणार नाही. यासाठी मी त्यांना सांगतो राजकारण करा, परंतु भाषा, जाती, धर्म यांना आधार घेऊ नका, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, शालेय शिक्षणात हिंदी सक्तीबाबतही वाद झाला होता. फडणवीस सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करत पहिलीपासून हिंदी सक्ती केली होती. याला राज आणि उद्धव ठाकरे यांनी तीव्र विरोध दर्शवला. त्यांनी 5 जुलैला मोर्चाची घोषणा केली होती. मात्र सरकारने तो निर्णय मागे घेत नरेंद्र जाधव समिती नेमली आणि मोर्चा रद्द झाला. त्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांनी एकत्र व्यासपीठावर आले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App