नाशिक : मोहन भागवत आणि मोदींना VRS घ्यायचा सल्ला; पण सल्लागारांना लोकांनीच CRS देऊन ठंडा केलाय मामला!!, अशी खरं म्हणजे संघ + भाजप काँग्रेस आणि उबाठा असल्या पक्षांची अवस्था झाली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही सप्टेंबर महिन्यामध्ये 75 वर्षांचे होत आहेत. 75 वर्षांची शाल पांघरली की रिटायर्ड व्हायला हवे, असे वक्तव्य मोहन भागवत यांनी नुकतेच एका कार्यक्रमात केले. भागवतांच्या या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमटा काढायची संधी काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेने घेतली. अर्थात उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी फक्त नरेंद्र मोदींना “व्हॉलेंटरी रिटायरमेंट” घेण्याचा सल्ला दिला. पण त्याचवेळी त्यांनी अमित शहा यांच्या निवृत्तीच्या योजनेविषयी समाधान व्यक्त केले.
पण त्यापुढे जाऊन काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच मोहन भागवतांनाही “व्हॉलेंटरी रिटायरमेंट” घेण्याचा सल्ला दिला. नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच मोहन भागवत हे देखील 75 वर्षांचे होणार आहेत त्यांच्या वाढदिवसा मध्ये फक्त सहा दिवसांचे अंतर आहे. त्यामुळे दोघांनीही आपापल्या झोळ्या उचलाव्यात आणि एकमेकांना मार्गदर्शन करायला जावे, असा टोमणा पवन खेडा यांनी लगावला.
एवढ्या देशांमध्ये जाऊन बिचारे पंतप्रधान पुरस्कार जिंकून आलेत त्यांचे कसे स्वागत केले जाते ते पहा मोहन भागवतांनी त्यांना ते 75 वर्षांचे होत असल्याची जाणीव करून दिली, असा टोमणा जयराम रमेश यांनी लगावला.
असल्या टोमण्यांमुळे लोकांची करमणूक झाली. पण ज्या काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मोहन भागवत आणि मोदींना रिटायरमेंटचा सल्ला दिला, तो रिटायरमेंटचा विषय अमित शाह, मोहन भागवत यांनी तरी स्वतःच काढला. याचा अर्थ ती “रिटायरमेंट” असलीच तर ती “व्हॉलेंटरी” असेल. काँग्रेसच्या किंवा उबाठा नेत्यांच्या सारखी “कंपल्सरी रिटायरमेंट” नसेल. कारण काँग्रेस आणि उबाठा नेत्यांना जनतेनेच “कंपल्सरी रिटायरमेंट” देऊन घरी बसवलेय. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांना तरी 2014 पासून “कंपल्सरी रिटायरमेंट” देऊन टाकली आहे. जनता अजूनही त्यांना त्या “कंपल्सरी रिटायरमेंट” मधून बाहेर काढून प्रत्यक्ष कामाला लावत नाहीये. ज्यांनी नुसते “व्हॉलेंटरी रिटायरमेंट” घेतल्याचे दाखविले आणि नंतर ते पुन्हा अध्यक्षपदाच्या खुर्चीला चिकटून बसले, त्यांना खरं म्हणजे रिटायरमेंट हा शब्द पचला नाही. कारण पुढची पिढी आपला वारसा चालवायला तेवढी कर्तृत्ववान निघेल की नाही याची त्यांना खात्रीच पटली नाही.
पण या सगळ्यांनी मोहन भागवत आणि नरेंद्र मोदींना “व्हॉलेंटरी रिटायरमेंट” घ्यायचा सल्ला देऊन लोकांनी आपल्याला दिलेल्या “कंपल्सरी रिटायरमेंट”चे कोंबडे झाकायचा डाव खेळला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App