विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde वरळी येथे झालेल्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या मेळाव्यावर टीका करताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील फरक दाखवून दिला आहे. राज ठाकरे यांच्या भाषणातून मराठी भाषेबाबतची तळमळ दिसली, पण उद्धव ठाकरे यांच्या भाषणात मात्र केवळ सत्ता, खुर्ची आणि स्वार्थाची मळमळ होती, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केला. Eknath Shinde
वरळी येथे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यावर टीका करताना शिंदे म्हणालेएकाने मराठीबद्दल असलेली तळमळ बोलून दाखवली. दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली. झेंडा नाही, अजेंडा नाही असे काही लोक म्हणत होते. पण एका वक्त्याने ते पथ्य पाळले, मात्र दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंग शारदेच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला.
मराठीबाबत बोलायचे झाले, तर त्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यगीत म्हटले, यासाठी त्यांचे अभिनंदन. पण महाराष्ट्राच्या राज्यगीताला मी मुख्यमंत्री असताना मान्यता दिली आणि ते राज्यगीत सुरू केले. मी मुख्यमंत्री असताना, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आमच्या टीमने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होकार देत तत्काळ मान्यता दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणाऱ्या मोदींनाही त्यांनी सोडले नाही. हे दुर्दैवी आहे. यातून त्यांची वृत्ती, त्यांची पोटदुखी दिसून आली. त्यांची लाचारी दिसून आली, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.
उद्धव ठाकरे माझ्यावर सातत्याने टीका करत असतात. पण मी त्यांच्या टीकेला उत्तर देत नाही. मी कामातून उत्तर दिले. त्यामुळेच मी मुख्यमंत्री झालो. अडीच वर्षांनी झालेल्या निवडणुकीतही आमचा मोठा विजय झाला, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का फेकला गेला? मराठी टक्का कमी का होत गेला? वसई, विरार, नालासोपारा, बदलापूर, अंबरनाथपर्यंत मराठी माणूस का गेला? याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारल्यावर लोकशाहीमध्ये कोणालाही कोणासोबतही युती आणि आघाडी करण्याचा अधिकार आहे. निवडणुका जशा जवळ येतील, तशा अनेक घटना दिसतील. त्यामुळे मी सर्वांनाच शुभेच्छा दिल्या आहेत. ठाकरे यांनी स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा बोलून दाखवला. त्यामुळे पोटातील ओठावर आले. मराठी माणसांचा अपेक्षाभंग झाला आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App