नाशिक : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटायला नको. पुढच्या पिढीने तो निर्णय घ्यायचा आहे, असे सांगून पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिदेशात सगळीकडे भारताच्या ऑपरेशन सिंदूरची आणि भारत – पाकिस्तान यांच्यातल्या तणावाची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची “चव्हाण + रेड्डी काँग्रेस” करून टाकली.करणाची मुभा देऊन टाकली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून खासदार + आमदारांची कामे होत नाहीत. सबब अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले पाहिजे, अशी भावना पवारांच्या राष्ट्रवादीतल्या सगळ्याच लोकप्रतिनिधींनी उघड आणि छुप्या पद्धतीने बोलून दाखविल्यानंतर पवारांना तसाही दुसरा पर्याय उरलाच नव्हता. पुढची पाच वर्षे विरोधात बसून पक्ष वाढविणे शक्य नव्हते. हे लक्षात येताच पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाचा निर्णय पुढच्या पिढीने घ्यावा. त्या निर्णय प्रक्रियेतून आपण बाजूला झालो आहोत, असे सांगून टाकले. दोन्हीकडच्या राष्ट्रवादीचे विचार एकच आहेत. आम्ही सगळे एकाच विचारांची माणसे आहोत, असा वैचारिक मुलामाही त्यांनी आपल्या वक्तव्याला दिला. आपल्या विचारांची माणसे वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत, अशी पुस्ती जोडून पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्याचा मार्ग मोकळा केला. पवारांनी फक्त “निवृत्ती” हा शब्द न वापरता प्रत्यक्षात राजकीय निवृत्तीच जाहीर करून टाकली.
– चव्हाण + रेड्डी काँग्रेस
यातून पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची “चव्हाण + रेड्डी काँग्रेस” केली. 1980 च्या लोकसभा निवडणुका इंदिरा काँग्रेस आणि चव्हाण + रेड्डी काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे लढविल्या होत्या. यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी चव्हाण + रेड्डी काँग्रेसचे नेतृत्व केले होते. त्यावेळी आपण इंदिरा गांधींचा पाडाव करू शकतो. देशातली लोकशाही वाचवू शकतो, असा आव चव्हाण + रेड्डी काँग्रेसने आणला होता. इंदिरा गांधींना त्यांनी हुकुमशहा ठरवून स्वतःला लोकशाहीचे रक्षणकर्ते मानले होते. प्रत्यक्षात 1980 च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसने चव्हाण + रेड्डी काँग्रेसचा दणकून पराभव केला. कराड लोकसभा मतदारसंघातून फक्त यशवंतराव चव्हाणच चव्हाण + रेड्डी काँग्रेस मधून निवडून येऊन खासदार झाले होते. त्यांना विरोधी बाकांवर बसावे लागले होते. पण यशवंतरावांच्या राजकीय प्रकृतीला विरोधी भाग मानवण्यासारखा नव्हता. कारण यशवंतराव कायम सत्तेच्या वळचणीला राहिले होते. त्यांनी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालीच वेगवेगळ्या मंत्रिपदांवर कामे केली होती. पण 1977 च्या आणीबाणी नंतरच्या निवडणुकी इंदिरा गांधींचा पराभव झाल्यानंतर यशवंतरावांना इंदिरा गांधी “हुकुमशहा” असल्याचा “साक्षात्कार” झाला होता. त्यामुळे त्यांचे नेतृत्व आपल्याला नको. आपण स्वतंत्रपणे काँग्रेस उभी करू, असे त्यांना वाटले होते. म्हणून त्यांनी 1978 ते 1980 या दोन वर्षात चव्हाण + रेड्डी काँग्रेस उभी करायचा प्रयत्न करून पाहिला. पण तो पूर्णपणे फसला. इंदिरा गांधींच्या नेतृत्वा पुढे यशवंतरावांचे नेतृत्व फारच फिके आणि तोकडे पडले. म्हणून यशवंतरावांनी आपल्या चव्हाण रेड्डी काँग्रेस मधले नेते आणि कार्यकर्ते टप्प्याटप्प्याने इंदिरा काँग्रेसमध्ये पाठविले आणि नंतर स्वतः इंदिरा गांधी पुढे शरणागती पत्करून ते इंदिरा काँग्रेसमध्ये सामील झाले होते.
– पवारांची अवस्था देखील वेगळी नाही, पण…
शरद पवारांची आजची अवस्था देखील फारशी वेगळी नाही. काँग्रेस सारख्या गलितगात्र पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस विलीन करून दोन्ही पक्षांचे भवितव्य गाळात घालायची त्यांची तयारी नाही. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सत्तेच्या वळचळीचा आधार देण्यासाठी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जायची मोकळीक दिली आहे. दोन्हीकडचे नेते आणि कार्यकर्ते तसेही एकमेकांशी संधान साधूनच असतील तर आपण उगाचच राष्ट्रवादी काँग्रेसची (शप) वेगळी वेगळी चूल पेटवून ठेवण्यात मतलब नाही. कारण त्या चुलीला इंधनच पुरणार नाही हे पवारांच्या लक्षात आले आहे म्हणूनच निवृत्ती हा शब्द न वापरता पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र करण्याचा निर्णय सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवून ते बाजूला झाले आहेत. काही झाले तरी ते “पवार” आहेत. त्यामुळे ते जे “बोलतील” ते “करतीलच” याची कुठलीही गॅरंटी नाही!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App