विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर याने पाकिस्तानी ओव्हरसीज कॉन्फरन्स मध्ये हिंदुत्वाच्या विरोधात गरळ ओकले. हिंदू समाज आणि भारताविरोधात विषारी भाषण केले. त्यामुळे दहशतवाद्यांना पहलगाम मध्ये हिंदूंचे हत्याकांड घडवायला चिथावणी मिळाली. दहशतवाद्यांनी 26 हिंदूंचे हत्याकांड केले.
पण या हत्याकांडाचा जगभर निषेध होत असताना सोनिया गांधींचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी मात्र असीम मुनीर याच्या भाषणालाच अप्रत्यक्ष पाठबळ दिले. भारतात हिंदुत्ववादी वातावरण तयार झाल्याने मुसलमानांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली. म्हणून पहलगाम मधले हत्याकांड घडले, असे अजब तर्कट रॉबर्ट वाड्रा यांनी लढविले.
पाकिस्तानी मुसलमान हे हिंदू पेक्षा वेगळे आहेत. त्यांचा धर्म, संस्कृती, भाषा सगळे वेगळे आहे. आपला धर्म भाषा आणि संस्कृती हिंदूंपेक्षा वेगळी आहे. आपण वेगवेगळे लोक आहोत. आपल्या राजकीय पूर्वजांनी टू नेशन थियरीच्या आधारे पाकिस्तानची निर्मिती केली. पाकिस्तानच्या सगळ्या पिढ्यांना पाकिस्तानचा इतिहास शिकवा. कलमाच्या आधारे कसा निर्माण झाला, हे त्यांना सांगा. आपल्या आधीच्या पिढ्यांनी पाकिस्तान निर्मितीसाठी बलिदान केल्याची आठवण त्यांना करून द्या, असे भाषण असीम मुनीर याने केले.
रॉबर्ट वाड्रा यांनी देखील असीम मुनीर याच्यासारखीच हिंदू द्वेषी भाषा वापरली. भारत सरकारने देशात हिंदुत्ववादी वातावरण तयार केल्याने इथल्या मुसलमानांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. हिंदुत्ववादी सरकारने वेगवेगळ्या मशिदींची सर्वेक्षणे केली. तिथे मूर्ती सापडल्या. हिंदुत्ववाद्यांनी बाबर, औरंगजेब यांच्यासारखे विषय समोर आणले. त्यामुळे मुसलमान समाज दुखावला म्हणून पहलगामसारखा हल्ला झाला. आपण धर्मनिरपेक्ष राहिलो नाही. त्यातून अतिरेक्यांना चिथावणी मिळाली, अशी मखलाशी रॉबर्ट वाड्रा यांनी केली.
पण त्यापलीकडे जाऊन हे काँग्रेस किंवा प्रियांका गांधी यांचे मत नाही, तर माझे वैयक्तिक मत आहे, अशी पुस्ती जोडून रॉबर्ट वाड्रांनी प्रियांका गांधी आणि काँग्रेस यांचा हात त्या दगडा खालून काढून घेतला. धर्म विचारून गोळ्या घालणे चूक असल्याचे ते म्हणाले, पण म्हणून काँग्रेस आणि पाकिस्तान यांच्या भाषेतले ऐक्य लपून राहिले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App