हमासचे 6 म्होरके संपविले, कासिम सुलेमानीला मारले, तसेच पाकिस्तानी ISI चे म्होरके आणि असीम मुनीरला मारा!!

नाशिक : याह्या सिनवार, मारवा इसाह, खालिद मशाल, मेहमूद जहर इस्माईल हनिया आणि मोहम्मद दैफ हे 6 जण कोण होते?? ते नेमके काय काम करत होते??, त्यांनी नेमके काय केले आणि त्यांच्या बाबतीत पुढे काय झाले?? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात देता येतील, ते म्हणजे, हे सगळे सीरिया मधल्या हमास दहशतवादी संघटनेचे म्होरके होते. या सगळ्यांनी इजराइल वर हल्ले करण्याचे कारस्थान रचले. त्यांच्या कारस्थानानुसार 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमास दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी इस्रायली ज्यू समाजाचे हत्याकांड केले…, पण नंतरच्या वर्षभरात वर उल्लेख केलेले हमास दहशतवादी संघटनेचे सगळे म्होरके इजराइलने खतम करून टाकले. इजरायली सैन्य दलाने गाजा पट्टीतून हमास दहशतवादी संघटनेची पाळेमुळे खणून काढली. संपूर्ण गाजा पट्टीचे कब्रस्तानात रूपांतर करून टाकले. Asim Munir and ISI

ज्यू समाजावरच्या हल्ल्यानंतर इस्रायलने जे हमास संघटनेच्या म्होरक्यांच्या बाबतीत केले, गाजा पट्टीची जी अवस्था करून ठेवली, तेवढीच कठोर आणि हिंस्र कारवाई पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI च्या बाबतीत भारताने केली पाहिजे. अमेरिकेने इराणचा उप लष्कर प्रमुख कासिम सुलेमानीला मारले, तसेच भारताने पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर याला मारले पाहिजे.

या सगळ्या सूचना कुठल्या हवेतून आल्या नाहीत. किंवा गुप्तपणे कुणी कुणाच्या कानात येऊन सांगितल्या नाहीत, तर त्या अमेरिकन पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्याने उघडपणे सांगितल्यात. कुठेही लपवाछपवी न करता नावे घेऊन त्या अधिकाऱ्याने भारत सरकारला परखडपणे या सूचना केल्यात.

हमास दहशतवादी संघटनेने 7 ऑक्टोबर 2023 रोजी ज्या पद्धतीने ज्यू समाजाचे हत्याकांड घडविले, त्याच पद्धतीने जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये पाकिस्तानी लष्कराच्या कमांडोजनी दहशतवाद्यांच्या बुरख्याखाली येऊन हिंदूंना टार्गेट केले. 26 हिंदूंचे हत्याकांड केले. काश्मीर मधून 370 कलम हटवून भारत आणि काश्मीर मधली परिस्थिती कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही ती सुधरवू देणार नाही, असा “संदेश” दहशतवाद्यांनी सगळ्या जगाला दिला.

पण त्या “संदेशा”चा “नेमका अर्थ” भारताने आणि संपूर्ण जगाने जाणून घेऊन पाकिस्तानी दहशतवादाची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत. पाकिस्तानी लष्कराला किंवा पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI ला कुठलीही वैध संस्था अथवा संघटना न मानता या दोन्ही संस्था आणि संघटना दहशतवादीच आहेत, असा त्यांच्यावर ठपका लावला पाहिजे. हमास ही दहशतवादी संघटना आहे, तशीच पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI या दहशतवादी संघटनाच आहेत, हे सत्य स्वीकारून त्या विरोधात कारवाई केली पाहिजे. अमेरिका जर इराणचा लष्कर प्रमुख कासिम सुलेमानीला मारत असेल तर भारताने पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीरला त्याच पद्धतीने मारले पाहिजे. असीम मुनीरचे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख हे कुठलेही अधिकृत पद न मानता दहशतवादी संघटनेचा म्होरक्या जसा संपविण्यात येतो, तसेच त्याला संपविले पाहिजे.

– सूचनेतला दम

मायकेल रुबीन या अमेरिकन पेंटॅगॉनच्या माजी अधिकाऱ्याच्या या सूचनेत खरा दम आहे. कारण पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर भारताने सिंधू नदी करार स्थगित केला. पाकिस्तानी दूतावासातले काही कर्मचारी कमी केले. अटारी बॉर्डर बंद करून टाकली किंवा पाकिस्तानी नागरिकांना भारत 48 तासांच्या आत सोडायला सांगितले. या उपायोजना राजनैतिक स्वरूपाच्या आहेत. हा पाकिस्तानची वैधता मान्य करण्याचा प्रकार आहे. सुरुवातीची प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हे ठीक आहे, पण त्यातून पाकिस्तानची “आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा” टिकवून ठेवायचे भारताला काहीच कारण नाही. म्हणूनच भारताने आता वर उल्लेख केल्याप्रमाणे असीम मुनीर हाच पाकिस्तानी दहशतवादाचा म्होरक्या आहे. पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI हेच दहशतवादाचे मूळ केंद्र आहे, या वस्तुस्थितीवर ठपका हाणून दोघांना संपविले पाहिजे. ISI मधले सगळे म्होरके टप्प्याटप्प्याने खतम केले पाहिजेत.

Eliminate Asim Munir and ISI leadership like HAMAS leadership elimination

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात