नॅशनल कॉन्फरन्सने म्हटले- सर्वांनी सामील व्हावे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Pahalgam attack मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चेंबर अँड बार असोसिएशनने बुधवारी संपूर्ण बंदचे आवाहन केले आहे. जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सनेही या बंदला पाठिंबा दिला आहे. पक्षाने त्यांच्या x अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.Pahalgam attack
“पक्षाध्यक्षांच्या निर्देशानुसार, जेकेएनसीने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत बंदच्या सामूहिक आवाहनात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे,” असे जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सने ट्विटरवर लिहिले. आम्ही जम्मू आणि काश्मीरच्या लोकांना धार्मिक आणि सामाजिक नेत्यांनी पुकारलेला बंद पूर्णपणे यशस्वी करण्याचे आवाहन करतो.
तत्पूर्वी, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला होता आणि पूर्ण बंदला पाठिंबा जाहीर केला होता.
मेहबूबा मुफ्ती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांची प्रतिक्रिया शेअर केली आणि लिहिले की, पर्यटकांवरील या भयानक दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ चेंबर अँड बार असोसिएशन जम्मूने बुधवारी पूर्ण बंदचे आवाहन केले आहे. पहलगाममधील या क्रूर हल्ल्यात मारल्या गेलेल्या निष्पाप लोकांच्या सन्मानार्थ या बंदला पाठिंबा देण्याचे मी सर्व काश्मिरींना आवाहन करते. हा हल्ला फक्त काही निवडक लोकांवर नाही तर आपल्या सर्वांवर आहे. आम्ही दुःख आणि संतापात एकजूट आहोत आणि या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी बंदला जोरदार पाठिंबा देतो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App