विशेष प्रतिनिधी
नागपूर : नागपूर मध्ये Nagpur औरंगजेबाच्या कबरी विरोधात विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले. त्यामुळे संतप्त झालेल्या एका गटाने सायंकाळी ७.३० नंतर महाल परिसरामध्ये तुफान दगडफेक करून गाड्यांची जाळपोळ केली. दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने तिथे पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी परिस्थिती आटोक्यात आणायचा प्रयत्न केला. दोन्ही गटांना बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गल्लीबोळात घुसलेल्या दुसऱ्या गटाच्या तरुणांनी दगड, चाकू, तलवारी, लाठ्या काठ्या फेकून पोलिसांना आणि अग्निशमन दलाच्या जवानांना मारल्या. त्यामध्ये साधारण 20 पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले. Nagpur
VIDEO | Visuals from Nagpur where violence erupted on Monday as stones were hurled at police. The city saw several incidents of stone-pelting and arson. (Source: Third Party)#NagpurViolence pic.twitter.com/sr37c1dxxE — Press Trust of India (@PTI_News) March 17, 2025
VIDEO | Visuals from Nagpur where violence erupted on Monday as stones were hurled at police. The city saw several incidents of stone-pelting and arson.
(Source: Third Party)#NagpurViolence pic.twitter.com/sr37c1dxxE
— Press Trust of India (@PTI_News) March 17, 2025
औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात असलेल्या कार्यकर्त्यांनी दुपारी औरंगजेबाची प्रतीकात्मक कबर जाळली. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असे सांगत संतप्त झालेल्या तरुणांनी सायंकाळ नंतर दगडफेक आणि जाळपोळ केली. पण पोलिसांनी दंगल आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांनी गल्लीबोळांमध्ये जाऊन कोंबिंग ऑपरेशन केले. ज्या तरुणांनी दगडफेक केली, त्यांची नावे सांगा असे आवाहन केले. परंतु पोलिसांच्या आवाहनाला या गल्लीबोळांमधून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांनी धडक कारवाई करून दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या तरुणांना पकडून रस्त्यावरच ठोकून काढले. सुमारे 35 तरुणांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबविले.
याच दरम्यान विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले. मंत्री आणि सत्ताधारी आमदार भडकाऊ भाषणे करत असल्याने नागपूर पेटले असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला, त्यांना यशोमती ठाकूर आणि अनिल देशमुख यांनी दुजोरा दिला. मात्र, बाहेरून प्लॅनिंग करून लोक आणून नागपूर मध्ये दंगल घडवण्याचा आरोप भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरची शांतता कायम ठेवली पाहिजे असे नागपूरकरांना आवाहन केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App