
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती, जाणून घ्या काय म्हणाले? State Governments
विशेष प्रतिनधी
मुंबई : राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचं दुकान सुरु करायचं असेल तर, यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक राहील. सोसायटीच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’शिवाय राज्यात नवीन बियर शॉपी किंवा दारु दुकान सुरु करता येणार नाही. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
याशिवाय अजित पवारांनी सांगितले की, शासनाची भूमिका राज्यात दारुविक्री वाढावी अशी नसून दारुबंदीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची आहे. अनेक दशकांपासून राज्यात दारुविक्रीचे परवाने बंद आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात दारु दुकानांना परवानगी नाही. स्थानिकांचा विरोध असेल तर मतदानाद्वारे दारुदुकाने बंद करण्याचा कायदा आहे.
तसेच, त्यात अधिक स्पष्टता येण्यासाठी दारुदुकान सुरु किंवा बंद करण्यासाठी महापालिका वार्डांमध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी ७५ टक्के मतदान हे ज्या बाजूनं होईल, त्यानुसार निर्णय होईल. राज्यात दारुविक्रीला प्रोत्साहन न देता अवैध दारुविक्री रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. अशी माहिती अजित पवारांनी दिली.
याचबरोबर दारुमुळे राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडेल, असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही. यासंदर्भात लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनेचा सकारात्मक विचार केला जाईल. असं अजित पवार म्हणाले आहेत.
State Governments new condition for beer shops and liquor stores
महत्वाच्या बातम्या
- Pankaja Munde पंकजा मुंडे “जे” बोलल्याच नाहीत, त्यावरून का झाला वादविवाद??; कुणी केला त्यांचा घात??
- रोहित शर्माच्या कॅप्टन्स इनिंगने चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरले भारताचे नाव!!
- Suresh Raina : सुरेश रैनाच्या तीन नातेवाईकांची हत्या करणारा असद पोलिस चकमकीत ठार
- Goa Police : गोवा पोलिसांची मोठी कारवाई, ११ कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त