विशेष प्रतिनिधी
पुणे : एकोणिसाव्या शतकातील उदारमतवादी राजकीय विचारवंत आणि महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची १५४ वी जयंती शनिवारी ( ९ मे) साजरी झाली. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोखले यांच्या विचारांना उजाळा दिला.
मोदी यांनी ट्वीट करुन नामदार गोखले यांचे स्मरण केले. मोदी म्हणाले की, ब्रिटीश साम्राजाविरुद्ध कायदेशीर, राजकीय मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया रचणा-या विचारवंतांपैकी नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे एक होते.
”गोपाळ कृष्ण गोखले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे मनापासून स्मरण करतो. अफाट ज्ञान असलेल्या या विलक्षण व्यक्तिमत्वाने शिक्षण आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण योगदान दिले,” असे मोदी यांनी म्हटले आहे.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांनी अनुकरणीय असे नेतृत्व केल्याचे मोदी यांनी म्हटले.
Array