विशेष प्रतिनिधी
मुंबई : कुठल्याही गरजू महिलेचे नाव लाडकी बहिण योजनेतून कमी केलेले नाही.योजनेसाठी जी महिला पात्र आहे तिला आम्ही लाभापासून कधीच वंचित ठेवणार नसल्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. Aditi Tatkare
निवडणूक काळात लागू केलेल्या लाडकी बहिण योजनेतून आता महिलांची नावे कमी केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्याला उत्तर देताना तटकरे म्हणाल्या, लाडकी बहिण योजना यशस्वीपणे राबविण्यात येत असून या योजनेच्या निकषात आम्ही कोणताही बदल केलेला नाही.ज्या गरजू महिला आहेत त्यांना पूर्वी प्रमाणेच लाभ मिळणार आहेत.
लाडकी बहिण योजनेचे ऑगस्ट महिन्यात ७० ते ७५ हजार अपात्र ठरले होते अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांसंदर्भात काही तक्रारी आल्याने हे अर्ज बाद केले. लाभ्यार्थ्यांची संख्या कमी होणे हे अचानक घडलेले नाही. तक्रारी आल्याने हे आहे. या योजनेचा शासन निर्णय जो आम्ही निर्गमित केला आहे..त्या निर्णयात कोणताही बदल आम्ही केलेला नाही.
लाडकी बहिण योजना यशस्वी झाल्यामुळे विरोधकांकडून असा अपप्रचार केला जात आहे. परंतू ही छाननी सरकार आल्यानंतर झालेली नाही तर ती ऑक्टोबरमध्येही झाली होती. डिसेंबरमध्येही झालेली आहे. ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात आलेल्या तक्रारींची पडताळणी सुरु आहे, असे तटकरे यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App