विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद :Gujarat गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला उमेदवार मिळणेही अवघड झाले आहे. काँग्रेसच्या तब्बल २१५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. या जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.Gujarat
येत्या रविवारी १६ फेब्रुवारी रोजी गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन हजार १७८ जागांसाठी मतदान होणार आहे. मात्र काँग्रेसच्या तब्बल २१५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. या सर्व जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपने दिलेल्या धमक्यांमुळे उमेदवारानी मैदानातून पळ काढला, असे आरोप काँग्रेसने केले आहेत .
गुजरातमध्ये ६८ नगरपालिका, जुनागढ महानगरपालिका, आणि तीन तालुका पंचायतांसाठीच्या निवडणुकीत २१५ जागांवर पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात १९६ नगरपालिका जागा, ९ जुनागढ महानगरपालिका जागा, आणि १० तालुका पंचायत जागा समाविष्ट आहेत . विशेषतः भचाऊ (२८ पैकी २२ जागा), हलोल (३६ पैकी १९), जाफराबाद (२८ पैकी १६), आणि बांटवा (२४ पैकी १५) या नगरपालिकांमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपने बहुमत मिळविले आहे .
काँग्रेसच्या प्रवक्त्या मनीष दोशी यांनी आरोप केला आहे की, भाजपने सत्तेचा गैरवापर करून आमच्या उमेदवारांना धमकावले आहे. जुनागढ आणि भचाऊसारख्या ठिकाणी उमेदवारांना पोलिसांकडे सुरक्षा मागावी लागली. वलसाड नगरपालिकेतील काँग्रेस उमेदवार ममता ढोलात्रे यांनी नातेवाईकांच्या दबावामुळे नामांकन मागे घेतल्याचे सांगितले .भाजपने या आरोपांना “राजकीय प्रचार” म्हणून नाकारले आहे .
गा जिंकल्या होत्या, पण २०२२ मध्ये त्यांची संख्या १७ वर खाली आली. या पार्श्वभूमीवर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची अवस्था वाईट झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १६ फेब्रुवारीला मतदान आणि १८ फेब्रुवारीला निकाल जाहीर करण्याचे घोषित केले आहे. उर्वरित १९६३ जागांसाठी मतदान होणार आहे . या निवडणुकीत भाजपच्या विरोधातील पक्षांनी युती न करता स्थानिक स्तरावर लढत आहेत. त्यामुळे भाजपला फायदा झाल्याचे सांगितले जात आहे .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App