…त्यामुळे सरकारने आमच्यावर केसेस टाकू नये, असंही राज ठाकरेंनी म्हटलं
विशेष प्रतिनिधी
पुणे : Raj Thackerays पुण्यात विश्व मराठी संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांचा सत्कार झाला. या संमेलनाला राज ठाकरेंनी उपस्थित रहावं अशी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी त्यांना गळ घातली होती.Raj Thackerays
यावेळी राज ठाकरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, ”… मी हल्ली अनेक ठिकाणी बघतो की २ मराठी माणसं भेटली की ती एकमेकांशी हिंदीत किंवा इंग्रजीत बोलतात, का असं ? आपणच आपल्या भाषेचं अस्तित्व टिकवलं नाही तर कसं होणार ? आज महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये मराठी माणसांना जसा मानसन्मान मिळायला हवा तो मिळत नाहीये. त्यात आपली भूमी, इथली जमीन बाहेरचेच गिळंकृत करत आहेत. आपण इतिहास असं म्हणतो तो कुठल्यातरी प्रदेशाला पादाक्रांत करण्यासाठी झालेल्या लढाईचा इतिहास असतो. आज महाराष्ट्रातील जमीन गिळंकृत करण्याचा जो डाव सुरु आहे, त्यातून उद्या जर आपलं म्हणजे मराठी माणसाचं अस्तित्वच पुसलं गेलं, तर मराठी भाषेचं अस्तित्व तरी काय राहणार आहे? मग आपला इतिहास तरी काय असणार ? यामुळे सरकारने मराठी भाषा टिकवण्यासाठी जसे प्रयत्न केले पाहिजेत, तसे प्रयत्न मराठी माणूस टिकावा म्हणून केले पाहिजेत. ”
”आम्ही आमच्या परीने मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी जे जे करणं शक्य आहे ते करत आहोत, करत राहू. सरकारने त्याला साथ द्यावी, काही वेळेला आमचे मार्ग वेगळे असतात, त्यामुळे सरकारने आमच्यावर केसेस टाकू नये, कारण जे आम्ही करत आहोत ते मराठी माणसासाठी करत आहोंत. बाकी साहित्यिकांनी साहित्य निर्माण केलंच पाहिजे पण भूमिका पण घेतली पाहिजे. आणि मराठी तरुण-तरुणींनी पण साहित्य वाचायला हवं, पुस्तक वाचलीच पाहिजेत. बौद्धिक मशागतीसाठी पुस्तकांना पर्याय नाही.”
”आपला इतिहास, आपले महापुरुष हे जगापर्यंत आपण पोहचवले पाहिजेत, पण हे करताना सध्या आपल्या महापुरुषांना जातीत विभागणं सुरु आहे, ते थांबलं पाहिजे… आपण मराठी भाषिक म्हणून एकत्र आलो, आपल्या भाषेशी, संस्कृतीशी घट्ट राहिलो तर जगात आपलं कोणीच वाकडं करू शकणार नाही हे विसरू नका….”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App