विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर INDI आघाडीत महत्वपूर्ण घडामोडी घडली. आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांची मते फुटली. त्यामुळे पंजाब मधल्या चंडीगडची महापौर निवडणूक भाजपने जिंकली.
त्याचे झाले असे :
चंदीगड मध्ये आधीची महापौर निवडणूक वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे कोर्टबाजी झाली. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती जयश्री ठाकूर यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या निरीक्षणाखाली आज चंडीगडची महापौर निवडणूक पुन्हा एकदा पार पडली. त्यामध्ये भाजपने बाजी मारली. कारण गुप्त मतदानात काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांची 3 मते फुटली. भाजपच्या उमेदवार हरप्रीत कौर यांना 19 मध्ये मिळाली, तर आम आदमी पार्टीच्या प्रेमलता यांना 17 मते मिळाली.
Sanjay Raut : मुंबईत स्वबळावर, महाराष्ट्रात इतरत्र आघाडी, संजय राऊत न्यांचा फॉर्मुला
चंडीगड मध्ये 35 नगरसेवकांची महापालिका आहे. परंतु चंडीगडचे खासदार देखील महापौर निवडणूक एक मतदान करू शकतात. त्यामुळे मतदारांची संख्या 36 होते बहुमतासाठी 19 मते मिळवावी लागतात. चंडीगड महापालिका मध्ये भाजपचे 16 नगरसेवक आम आदमी पार्टीचे 13 नगरसेवक तर काँग्रेसचे 6 नगरसेवक आहेत. भाजपा जरी सगळ्यात मोठा पक्ष असला तरी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस मिळून बहुमताचा आकडा पार करू शकतात.
परंतु, प्रत्यक्षात भाजपच्या उमेदवाराला 19 मध्ये मिळाल्याने काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची 3 मते फुटल्याचे स्पष्ट झाले. या दोन्ही पक्षांना आपापल्या नगरसेवकांची एकजूट राखता आली नाही. त्याचबरोबर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांशी सुसंवाद ठेवला नाही. त्याचा परिणाम चंडीगडच्या महापौर निवडणूक दिसला. त्याचेच प्रतिबिंब विधानसभेच्या निवडणुकीत पडायची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App