मुंबईच्या धारावीत भीषण अपघात, टँकरची सहा कारला जोरदार धडक!

घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : धारावी परिसरात भीषण अपघात घडला आहे. येथे रस्त्याच्या कडेला 6 गाड्या उभ्या होत्या. दरम्यान, भरधाव वेगात आलेल्या एका अनियंत्रित टँकरने सर्व वाहनांना मागून धडक दिल्याने सर्व वाहने खड्ड्यात पडली. सध्या या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. यासोबतच अग्निशमन दलाच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

धारावीत भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सहा वाहनांना धडक दिली. धडकल्यानंतर सर्व वाहने खड्ड्यात पडली. सध्या या अपघातात कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. सकाळी सहा वाजता हा अपघात झाला. अपघात झालेल्या वाहनांच्या मालकांनी रात्री रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून आपापल्या घरी गेले होते. पहाटे भरधाव वेगात आलेल्या अनियंत्रित टँकरने वाहनांना धडक दिली.

धडक होताच सर्व वाहने खड्ड्यात पडली. घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांचे म्हणणे आहे की हा अपघात खूपच भयानक होता. भरधाव वेगात आलेल्या टँकरने वाहनांना धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे.

Terrible accident in Mumbai’s Dharavi tanker hits six cars

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात