विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख वाल्मीक कराड प्रकरणांमध्ये विरोधकांच्या टीकेचा सगळा रोख मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि वाल्मीक कराडचे आश्रयदाते म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे आहे. पण धनंजय मुंडे ज्या राष्ट्रवादीत आहेत, त्या राष्ट्रवादीचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र सूचक मौन बाळगून बसले आहेत. त्यांच्यावर विरोधक “सिलेक्टिव्हली” टीका करताना दिसत नाहीत.
सगळे विरोधकांनी टीकास्त्र सोडताना देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्या जुन्या संबंधांवर कॉन्सन्ट्रेट करून दोघांनाही दोषी ठरवण्याचा प्रयत्न चालविला आहे या सगळ्यात सत्तेचे सगळे उपभोग घेऊन अजितदादा मात्र नामानिराळे राहिले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे त्याबद्दल दुमत नाही पण म्हणून अजितदादा त्या विषयापासून हात झटकून बाजूलाही होऊ शकणार नाहीत कारण ते फडणवीस सरकार मध्येच उपमुख्यमंत्री आहेत.
सुप्रिया सुळेंनी सांगून देखील युगेंद्र पवारांनी फेरमतमोजणीचा अर्ज मागे घेतलाच नाही??
खरंतर अजित पवार धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड हे दोघेही शरद पवारांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी प्रवृत्तीचे “प्रॉडक्ट” आहेत. सध्या धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या बरोबर भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसल्याने अजित पवारांनी त्यांना मंत्री केले. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या कुठल्याही राजकीय कृत्याची जबाबदारी जशी खुद्द धनंजय मुंडे यांची आहे, तशीच ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून अजित पवारांची आहे. पण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या संतोष देशमुख वाल्मीक कराड प्रकरणात अजित पवारांनी मात्र सूचक मौन बाळगले आहे. सध्या ते परदेशात गेल्याची बातमी आहे. पण म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख या नात्याने त्यांची जबाबदारी संपत नाही.
खरंतर भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांनी अजितदादांवर ही जबाबदारी निश्चित करून त्यांना जाब विचारला पाहिजे. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाड्या आवळल्या पाहिजेत. त्याशिवाय महाराष्ट्रातली ही कीड नष्ट होणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App