वृत्तसंस्था
ढाका : Mohammad Yunus बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर देशातील सर्व काही उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला. युनूस म्हणाले की, हसीनांनी आपल्या 15 वर्षांच्या कार्यकाळात देशातील सरकारी यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त केली. लोकशाही, आर्थिक स्थैर्य आणि जनतेचा विश्वास पुनर्संचयित करून त्याची पुनर्बांधणी करण्याची आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. निक्केई एशिया या जपानी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.Mohammad Yunus
युनूस यांनी सध्या बांगलादेशात निवडणुका होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. हसीनांच्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आम्ही अधिकृतपणे भारताकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करू, असे ते म्हणाले. बांगलादेशातील सत्तापालटानंतर माजी पंतप्रधान हसीना हद्दपार जीवन जगत आहेत.
संविधान आणि न्यायव्यवस्थेत बदल झाल्यानंतर निवडणुका
हसीना यांच्या राजवटीत लोकशाही तत्त्वांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप युनूस यांनी केला. हसीना यांनी सलग तीन वेळा मतदारांच्या सहभागाशिवाय बनावट निवडणुका घेतल्या. त्यांनी कोणताही संघर्ष न करता स्वत:चा आणि पक्षाचा विजय घोषित केला.
संविधान आणि न्यायव्यवस्थेत बदल झाल्यानंतरच देशात निवडणुका होतील. देशातील निवडणुकांपूर्वी प्रशासन, नोकरशाही आणि न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे.
देशाची घटना, न्यायव्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेत बदल करण्यासाठी अंतरिम सरकारने अनेक आयोगांची स्थापना केली आहे. या आयोगांकडून प्राप्त झालेल्या शिफारशींची अंमलबजावणी जानेवारीपासून पूर्ण प्रमाणात केली जाईल. या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास वेळ लागू शकतो. आम्ही पूर्णपणे नवा बांगलादेश निर्माण करत आहोत.
खटला पूर्ण झाल्यानंतर आम्ही हसीनाच्या भारताकडे प्रत्यार्पणाची अधिकृतपणे मागणी करू. भारत आणि बांगलादेशने आंतरराष्ट्रीय कायद्यावर स्वाक्षरी केली, त्यानुसार भारताला बांगलादेशची मागणी मान्य करावी लागणार आहे.
याशिवाय, युनूस यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांबाबत भारत सरकारची चिंता निराधार आणि अपप्रचार असल्याचे म्हटले आहे. त्रिपुरातील बांगलादेशी मिशनवर झालेल्या हल्ल्यानंतर बांगलादेशने मंगळवारीच भारतीय उच्चायुक्तांना बोलावले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App