राहुल गांधींनी सरकार अदानींना वाचवल्याचा केला आरोप Lok Sabha and Rajya Sabha
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज सुरळीत सुरू नाही. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांच्या प्रचंड गदारोळामुळे कामकाज तहकूब करावे लागले.
लोकसभेत चर्चा सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रचंड गदारोळ केला. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब केले. 12 वाजता कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ केला. यानंतर लोकसभेचे कामकाज उद्या सकाळपर्यंत तहकूब करण्यात आले.
Bangladesh बांगलादेशातील हिंदू पुजाऱ्याच्या अटकेवर भारताने नोंदवला तीव्र आक्षेप
वास्तविक, विरोधी पक्षाचे खासदार उत्तर प्रदेशातील संभळमधील गोंधळ आणि अदानीशी संबंधित प्रकरणावर लोकसभेत चर्चेची मागणी करत आहेत. विरोधकांच्या मागणीवर लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज चालू द्यावे, असे सांगितले. प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होईल.
लोकसभेसोबतच राज्यसभेतही विरोधकांकडून प्रचंड गदारोळ झाला. यानंतर राज्यसभेचे कामकाज प्रथम सकाळी 11.30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. यानंतर राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App