विशेष प्रतिनिधी
हिंगोली : Amit Shah देशात सर्वत्र बॉम्बस्फोट होत असताना सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांचे काँग्रेसचे सरकार शांत बसले होते. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करून अतिरेक्यांचा खात्मा केला. मोदी यांनी देशाला सुरक्षित व समृद्ध बनवण्याचे काम केले, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी ता. १५ हिंगोली येथे बोलताना केला. Amit Shah
अमित शहा यांची शुक्रवारी हिंगोली येथील रामलिला मैदानावर महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते, हिंगोलीचे उमेदवार तान्हाजी मुटकुळे, कळमनुरीचे शिंदेसेनेचे उमेदवार संतोष बांगर, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, कैलास काबरा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. Amit Shah
यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की, महाराष्ट्रात औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव, अहमदनगरचे अहिल्यानगर, वर्सोवा वरळी सी लिंकचे स्वातंत्र्यवीर सावरकर असे नामकरण करण्यात आले. मात्र काँग्रेसने नवीन उपक्रमांना पंडीत नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या शिवाय कोणाचेही नाव दिले नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याचे काम काँग्रेसने केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. काँग्रेस सरकार पायउतार झाल्यानंतरच बाबासाहेबांना भारतरत्न मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Amit Shah
काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांना लॉन्च करण्याचे वीस वेळा प्रयत्न केले. आता २१ वा प्रयत्न देखील फोल ठरणार असल्याची टीकाही त्यांनी केली. काश्मीरमधील ३७० कलम पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव काँग्रेस पक्षाने आणला आहे. मात्र गांधी घराण्याची चौथी पिढीही हे कलम पुन्हा लागू करू शकणार नाही. काँग्रेसने ७० वर्ष राम मंदिर अडवून ठेवले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षातच केसही जिंकली, भूमीपूजन केले, मंदिर उभारले आणि प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठाही केली. यावर्षी प्रथमच प्रभू श्रीरामाची दिवाळी भव्य राम मंदिरात झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ठाकरे सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते औरंगजेब फॅनक्लबच्या कडेवर बसले आहेत. हिंदुत्वाला पाखंड म्हणणाऱ्यांची साथ देत आहेत. अफजलखान, औरंगजेबाची कबर सुशोभीत करणाऱ्यांना साथ देणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कोणता मार्ग दाखविला हे लक्षात घेतले पाहिजे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल चांगले बोलून घेऊन दाखवावे, असे आव्हानही शहा यांनी यावेळी दिले.
राज्यातील मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस सरकार गरजू जनतेला समर्पित असून जनतेला घरे, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, धान्य, मोफत गॅस सिलेंडर व आता पाच लाख रुपयांपर्यंतचा मोफत औषधोपचाराची व्यवस्था केल्याचेही शहा यांनी यावेळी सांगितले. महायुतीचे सहकार दिव्यांग, वृध्द व विधवांना दरमहा १५०० रुपये सेवानिवृत्ती वेतन देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App