राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी केली नियुक्ती
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने आता संघटनेत बदल करण्यास सुरुवात केली आहे. जम्मू-काश्मीर भाजपचे नवे अध्यक्ष म्हणून भाजपने सत शर्मा यांची नियुक्ती केली आहे. पक्षाने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी सत शर्मा यांची भारतीय जनता पार्टी जम्मू-काश्मीरच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
रविंदर रैना यांना जम्मू-काश्मीर भाजप अध्यक्षपदावरून काढल्यानंतर आता त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाने सत शर्मा यांना राज्याचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते.
जम्मू-काश्मीर भाजपचे नवे अध्यक्ष सत शर्मा यांनी यापूर्वीच हे पद भूषवले आहे. त्यांना संघटनेत काम करण्याचा अनुभव आहे. रवींद्र रैनाचा कार्यकाळ फार पूर्वीच संपला होता. 2018 पासून ते या पदावर होते. पक्ष संघटनात्मक निवडणुकांच्या तयारीत आहे, त्यामुळे नेतृत्व बदल ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. आगामी काळात पक्षाला अनेक राज्यांमध्ये नवे अध्यक्ष मिळण्याची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
भाजपने सत शर्मा यांना दुसऱ्यांदा जम्मू-काश्मीर भाजपचे अध्यक्ष बनवले आहे. यापूर्वी त्यांनी 2014-2018 या काळात हे पद भूषवले होते. सत शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 2014 च्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत 25 जागा जिंकल्या होत्या. ते चार्टर्ड अकाउंटंट आहे. त्यांचा जन्म जम्मूतील डोगरा ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण जम्मूमध्येच झाले.
1981 मध्ये त्यांनी जम्मू विद्यापीठाच्या जीजीएम सायन्स कॉलेजमधून बीएससी केले. 1986 मध्ये ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटचे फेलो बनले. 2014 मध्ये भाजपने त्यांची जम्मू-काश्मीरमध्ये पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. भाजप-पीडीपी सरकारमध्ये त्यांना मंत्री करण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App