सरमा हे झारखंड निवडणुकीसाठी भाजपचे सहप्रभारी आहेत
विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी सांगितले की झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला तर हुसैनाबाद उपविभागाला नवीन जिल्हा बनवले जाईल आणि त्याचे नाव प्रभू राम किंवा कृष्ण असेल. सरमा हे झारखंड निवडणुकीसाठी भाजपचे सहप्रभारी देखील आहेत. Jharkhand
सरमा म्हणाले, राज्यातील घुसखोरांना हुसकावून लावणे हे पक्षाचे प्राधान्य असेल. ते म्हणाले, हुसेनाबाद हा नवा जिल्हा निश्चितच करणार. त्याला प्रभू राम किंवा कृष्णाचे नाव दिले जाईल. नव्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत हुसैनाबाद स्वतंत्र जिल्हा घोषित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
जपला येथील कर्पुरी मैदानावर भाजप नेते सरमा निवडणूक सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी भाजपचे उमेदवार कमलेश सिंह यांच्यासाठी मते मागितली. कमलेश सिंह हे झारखंडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार होते, त्यांनी ४ ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये प्रवेश केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App