विशेष प्रतिनिधी
मुंबई : Rupesh Mhatre आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांची बंडखोरी सुरूच असल्याचे दिसत आहे. भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे रईस शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला असून तो कायम ठेवण्यात आला आहे. त्यांच्या समर्थकांनी शनिवारी भिवंडी शहरात शक्तिप्रदर्शन देखील केले आहे.Rupesh Mhatre
रुपेश म्हात्रे म्हणाले, कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना खासदार बनवण्यासाठी भिवंडीमध्ये आम्हाला कपिल पाटील यांचे काम करण्यास भाग पाडले. तसेच चार पक्ष फिरून आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी देखील आम्ही काम केले. प्रत्येक वेळेस आमचा बळी का म्हणून द्यायचा, असा सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना रुपेश म्हात्रे म्हणाले, वरळी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या मुलाला फायदा होईल म्हणून भिवंडीमध्ये समाजवादी पक्षाला शिवसेना पक्षाने समर्थन देऊन आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम्ही हा अन्याय सहन करणार नसून या निवडणूक लढणार असल्याचा निर्धार ठाकरे गटाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे यांनी केला आहे. ही निवडणूक कोणाला हरवण्यासाठी किंवा जिंकवण्यासाठी नसून मला जनतेच्या मदतीने निवडणूक जिंकायची आहे, असा निर्धार देखील रुपेश म्हात्रे यांनी केला आहे.
रुपेश म्हात्रे यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनात माजी खासदार सुरेश टावरे यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी देखील सहभागी होते. यावेळी सुरेश टावरे म्हणाले, समाजवादी पार्टीचे रईस शेख हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही त्यांच्या सोबत होतो.पण त्यांचे राज्यातील पक्षप्रमुख अबू आझमी हे त्यानंतर भिवंडी पश्चिम विधानसभेत महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार दयानंद चोरगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असताना तिथे समाजवादी पक्षाच्या रियाज आझमी यांचा अर्ज दाखल करण्यासाठी सुध्दा आले. त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नसल्याचे सुरेश टावरे म्हणाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App