विशेष प्रतिनिधी
Maha Vikas Aghadi राज्यातील अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीत वादावादी सुरू झाली आहे. शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने धाराशिव जिल्ह्यातील परांडा मतदारसंघात रणजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केली हाेती. मात्र, राष्ट्रवादी काॅंग्रेसने याठिकाणी राहूल माेटे यांचे नाव जाहीर केले आहे. परांडा मतदारसंघात राहूल माेटे यांची दावेदारी असतानाही उध्दव ठाकरे यांनी हट्टाने माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली हाेती. मात्र, आता राष्ट्रवादीने राहुल माेटे यांची उमेदवारी जाहीर केल्याने काेण मागे घेणार अशी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.Maha Vikas Aghadi
प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. दुसऱ्या यादीमध्ये एकूण 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसरी यादी समोर आली आहे.दुसऱ्या यादीमध्ये अकोल्यामधून अमित भांगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर एरंडोलमधून सतिश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गंगापूरमधून सतिश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पर्वतीमधून आश्विनी कदम, बीडमधून संदीप क्षीरसागर, माळशिरसमधून उत्तम जानकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एरंडोल – सतीश अण्णा पाटील . गंगापूर – सतीश चव्हाण शहापूर – पांडुरंग बरोरा, परांडा – राहुल मोटे बीड – संदीप क्षीरसागर, आर्वी – मयुरा काळे, बागलान – दीपिका चव्हाण, येवला – माणिकराव शिंदे सिन्नर – उदय सांगळे दिंडोरी – सुनीता चारोस्कर, नाशिक पूर्व – गणेश गीते, उल्हासनगर – ओमी कलानी, अकोले- अमित भांगरे अहिल्या नगर शहर – अभिषेक कळमकर , माळशिरस उत्तमराव जानकर, फलटण – दीपक चव्हाण , चंदगड -नंदिनीताई भाबुळकर कुपेकर , इचलकरंजी – मदन कारंडे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App