Devendra Fadnavis गुलाबी जॅकेट सह सगळेच रंग आवडतात, पण मनात भगवा; उमेदवारी अर्ज भरल्यावर फडणवीसांचे सूचक उद्गार!!

Devendra Fadnavis interaction with media

विशेष प्रतिनिधी

नागपूर : गुलाबी जॅकेट मी काही पहिल्यांदा घातलेले नाही. मी सगळ्याच रंगाची जॅकेट्स घालतो, मला सगळेच रंग आवडतात, पण मनात भगवा आहे, असे सूचक उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात काढले. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या.

देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठे शक्ती प्रदर्शन करत नागपुरातून विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीचे सगळे महत्त्वाचे नेते हजर होते. फडणवीसांची ही सहावी निवडणूक आहे. जनतेने गेल्या 5 निवडणुकांमध्ये आपल्याला भरभरून आशीर्वाद दिला. सहाव्या वेळी देखील जनता आणि विशेषतः आमच्या लाडक्या बहिणी निश्चित आशीर्वाद देतील, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. नागपूरच्या जनतेने मला आणि फडणवीसांना भरभरून आशीर्वाद दिला म्हणून नागपूरचा विकास होऊ शकला. तो विकास केवळ गडकरी, फडणवीस किंवा बावनकुळे यांनी केला नाही, तर जनतेच्या आशीर्वादानेच तो विकास झाला, असे उद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.


Vijayatai Rahatkar : महिला राजकारणात केवळ 5 वर्षे पाहुण्या हे चित्र आता बदलावे; केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांचे मत

उमेदवारी अर्ज दाखल करताना देवेंद्र फडणवीस यांनी गुलाबी जॅकेट परिधान केले होते. त्यामुळे पत्रकारांनी त्यांना तुम्ही देखील अजितदादांसारखे गुलाबी जॅकेट नेहमी घालणार का??, असा सवाल केला. त्यावर फडणवीस यांनी मी गुलाबी जॅकेट काही पहिल्यांदा घातले नाही. ते अनेकदा घालत असतो, मला सगळेच रंग आवडतात, पण मनात भगवा रंग आहे, असे उत्तर दिले. या उत्तरातून त्यांनी एकाच वेळी संघाला आणि भविष्यात महायुतीमध्ये सामील होऊ शकणाऱ्या वेगवेगळ्या घटकांना चुचकारल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

अनिल देशमुख यांच्या डायरी संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर फडणवीसांनी अशा काल्पनिक डायऱ्या लिहून काही होत नाही. शेवटी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट मध्ये काय म्हटले आहे, ते महत्त्वाचे असते. ते तुम्ही वाचलेत की सगळे समजेल, असा टोला हाणला.

Devendra Fadnavis interaction with media

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात